Agriculture news in marathi Waiting for rain in Nagar district | Page 2 ||| Agrowon

नगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 जुलै 2021

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असला तरी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळता जिल्हाभरात पावसाची प्रतीक्षा आहे.

नगर : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असला तरी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळता जिल्हाभरात पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला असल्याने भंडारदरा, निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळातही पाणी येण्याची आशा वाढली आहे. 

 नगर जिल्ह्यात खरिपाच्या सरासरीएवढी पेरणी होत आली असली तरी गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र कमीच आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातही यंदा अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. पाऊस नसल्याने भात लावणीलाही फारसा वेग येत नव्हता. मुंबई, कोकणात व घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने अकोल्याच्या पश्चिम भागातील घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी, भंडारदरा परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणात ०.२५ टीएमसी पाणी आले आहे. भंडारदरा धरणातून ८३७ क्युसेकने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळा नदीही कोतूळजवळ ३ हजार २१२ क्युसेकने पाणी वाहत आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत घाटघरला ७४, रतनवाडीला ८२, पांजरे येथे ४६, वाकी येथे ३५, भंडारदरा येथे ४१ मिलिमीटर पाऊस  झाला. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस नसल्याने अन्य प्रकल्पात पाण्याची आवक नाही.

कोयना धरण ५० टक्के भरले
सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाणी आवक वाढली आहे. धरणात पाण्याची आवक २८ हजार ६५६ क्युसेकने होत आहे. धरणातील पाणीसाठा ५४.०५ टीएमसी झाला आहे.
 जिल्ह्यात बहुतांशी भागात पाऊस सुरू झाला आहे.

अधूनमधून हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता. २०) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच होती. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला ८९, नवजात १५२, तर महाबळेश्वर येथे ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी २१११.१० फूट असून, धरणात ५४.०५ टीएमसी एकूण तर ४८.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.  

इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू झाला आहे. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणात सर्वाधिक पाणीसाठा होत असतो. यंदा मात्र जून व जुलै महिन्याचे तीन आठवडे पावसाशिवाय गेले आहे.

यामुळे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणाचे भवितव्य ठरणार आहे. जिल्ह्यात पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मंगळवारपासून कमी प्रमाणात का होईना सुरू झालेला पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. मात्र पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पुरंदरमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
परिंचे, जि. पुणेे : काळदरी (ता.पुरंदर) खोऱ्यात पाण्याची उपलब्धता झाली अशा तुरळक ठिकाणी भात लागणीला सुरुवात झाली आहे. पुरंदर किल्ला परिसर पावसाचे आगार समजले जात असले तरी बहुतांशी भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भात रोपांवर परिणाम झाला असून, रोपांच्या संख्येत घट झाली असल्याचे बहिरवाडी येथील शेतकरी राजेंद्र भगत यांनी सांगितले.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी बहिरवाडी,कोंडकेवाडी, बांदलवाडी परिसरातील काही भात खाचरात पाणी आले आहे तेथील शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरवात केली आहे.काळदरी, धनकवडी, दवणेवाडी,मांढर परिसरातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून भात लागवडी खोळंबल्या आहेत. या परिसरात इंद्रायणी भाता बरोबर संकरीत वाणांची लागवड केली जाते संकरी वाणांचा उत्पादन कालावधी कमी असतो पाऊस लांबल्याने भात रोपे लावणी बाहेर चालली आहेत. तरवे टाकल्यावर पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे अंकुश परखंडे यांनी सांगितले.

पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भात रोपांची उंची खुंटली आहे याचा परिणाम उत्पादन होणार आहे.भात लागवड करताना रोपांची उंची कमी असल्याने पाण्यात रोप दिसत नसल्याचे महिला शेतकरी सुनिता भगत यांनी सांगितले यावेळी पुजा चिव्हे, संगिता चिव्हे, रुपाली पांगसे मंगल कोकरे आदी भात लागवड करणाऱ्या महिला शेतकरी उपस्थित होत्या.काळदरी खोऱ्यात भुईमूग, नाचणी, बाजरी आदी खरीपातील पिके जोमा पिकांच्या खुरपणीची कामे पूर्ण झाली आहेत.


इतर ताज्या घडामोडी
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...