‘माण’मध्ये पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

आधी दुष्काळाने आणि आता पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे. - अर्जुनराव शेडगे, शेतकरी, गोंदवले खुर्द
‘माण’मध्ये पाऊस थांबण्याची प्रतीक्षा
‘माण’मध्ये पाऊस थांबण्याची प्रतीक्षा

गोंदवले, जि. सातारा : गेले कित्येक वर्षे पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे पाणी नाही. शेतीत पीक नाही अशीच अवस्था असल्याने गेल्या एक महिन्यापूर्वी ये रे...ये रे..पावसा म्हणावे लागत होते. मात्र, यंदा पावसाने सर्वच मर्यादा ओलांडल्याने ऐन हिवाळ्यात पावसाळा अनुभवावा लागतोय. या सलगच्या पावसाने आता माण तालुक्यातील जनतेला आता पाऊस थांबण्याची प्रतीक्षा आहे. 

पाच-दहा वर्षांतून कधीतरी पावसाने सरासरी गाठली, की त्या पाण्यावर पुढची काही वर्षे कशीबशी घालवयाची. परिणामी नेमिची येतो दुष्काळ अशीच अवस्था होऊन जाते. गेल्या जवळपास तीन वर्षांत अशीच अवस्था येथील लोकांना अनुभवावी लागली. दुष्काळाने जनजीवनच विस्कळित झाले. त्यामुळे माणवासियांचे डोळे आकाशाकडे लागले होते. या दुष्काळी संकटातून सुटण्यासाठी प्रत्येकजण पावसासाठी विनवणी करत होता. ही विनवणी ऐकली आणि माणमध्येही पावसाने सुरवात केली. अवघ्या काही दिवसांतच या पावसाने जोर धरला. बघता बघता सगळे पाणीसाठे भरून वाहू लागले. 

कित्येक वर्षे ना वाहिलेली माण नदीही या वेळी दुथडी भरून वाहिली. सगळी भांडी भरून झाली तरीही पावसाने मुक्काम हलविला नाही. त्यामुळे आता सुरू झाले नुकसान. शेतात पाणी साचल्याने पेरणी खोळंबली. शेतीचे बांध फुटून माती वाहिली. रस्ते, पूल वाहिल्याने वाहतूक खोळंबली. घरांचे नुकसान होऊ लागले. बंधाऱ्याच्या भिंती ढासळतायेत. साथीचे रोग बळावतायेत. पाण्यात लोक बुडून मरण्याच्या घटना घडतायेत. पण, पाऊस काही थांबेना. आधी दुष्काळाने आणि आता पावसाने लोकांचे कंबरडे मोडले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com