Agriculture news in marathi; Waiting for rain in Washim district | Agrowon

वाशीम जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षाच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

अकोला ः पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने पूर्ण होत आहेत. या काळात असमतोल स्वरूपाचा पाऊस पडल्याने लगतच्याच दोन तालुक्यात, जिल्ह्यात भागात भिन्न परिस्थिती तयार झाली आहे. अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत १२ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला. मात्र, लगतच्याच वाशीम जिल्ह्यात अवघा ५६.७८ टक्के पाऊस पडल्याने तेथील पिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढण्याच्या दृष्टीने पाऊस आवश्यक असून वाशीम जिल्ह्यात प्रकल्पांची स्थिती अत्यंत जेमतेम आहे.

अकोला ः पावसाळ्याचे जवळपास अडीच महिने पूर्ण होत आहेत. या काळात असमतोल स्वरूपाचा पाऊस पडल्याने लगतच्याच दोन तालुक्यात, जिल्ह्यात भागात भिन्न परिस्थिती तयार झाली आहे. अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत १२ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या ७० टक्के पाऊस झाला. मात्र, लगतच्याच वाशीम जिल्ह्यात अवघा ५६.७८ टक्के पाऊस पडल्याने तेथील पिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढण्याच्या दृष्टीने पाऊस आवश्यक असून वाशीम जिल्ह्यात प्रकल्पांची स्थिती अत्यंत जेमतेम आहे.

अकोला जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६९७ च्या तुलनेत ४९० मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अकोला, मूर्तिजापूर या तालुक्यांची सरासरी ६० टक्क्यांच्या आत आहे. तर  बार्शिटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर या तालुक्यांची सरासरी ६० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक ६६७ मिलिमीटरच्या ४६७ मिलिमीटर पाऊस झाला. या जिल्ह्यात आत्तापर्यंत संग्रामपूर आणि बुलडाणा तालुक्यांनी पावसात आघाडी घेतली आहे. या दोन्ही तालुक्यांत पावसाने आत्तापर्यंत दमदार हजेरी लावली आहे. या जिल्ह्यातील मराठवाड्याला लागून असलेल्या देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार या तालुक्यांना पावसाची गरज आहे.

देऊळगावराजा तालुक्यात सरासरीच्या केवळ ३९.९२ टक्के इतका कमी पाऊस पडला. अशीच गत सिंदखेडराजाची आहे. या तालुक्यात  सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला. तरी हा पाऊस असमतोल असल्याने पीकपरिस्थिती अडचणीत आहे. लोणारमध्ये सरासरीच्या ४८ टक्के तर मेहकरमध्येही ५५.१२ टक्केच पाऊस पडला आहे.

वाशीम जिल्ह्यात वाशीम, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड या सर्वच तालुक्यांचा विचार केला तर आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ ५६ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वच प्रकल्प जेमतेम पातळीवर आहेत. 

वऱ्हाडात आजवरच्या पावसाने प्रामुख्याने अकोला व बुलडाणा जिल्ह्यात प्रकल्पांना फायदा झालेला आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वारी हनुमान येथील वान प्रकल्पात ७५ टक्क्यांवर जलसाठा झाल्याने गेल्या आठवडाभरापासून प्रकल्पाच्या सहा गेटमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. या  प्रकल्पात सातपुडा पर्वत रांगांमधील विविध नदीनाले येऊन मिसळतात. सध्या ही आवक सुरू असल्याने गेट ०.१० मीटरने उघडलेलेच आहेत. परिणामी वान नदी दुथडी भरून वाहत आहे.  

जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी (१३ ऑगस्ट अखेरीस ) 

जिल्हा सरासरी पडलेला पाऊस टक्केवारी
अकोला ६९७ ४९० ७०.२९
बुलडाणा ६६७ ४६७ ७०.०२
वाशीम ७९८ ४५३ ५६.७८

 

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...