टेंभू योजनेच्या आवर्तनाची प्रतीक्षा

आटपाडी तालुक्यात तापमान वाढल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. बंधारे व तलावात पाणीसाठा कमालीचा घटला आहे. सध्या उन्हाळी हंगामासाठी टेंभू योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. टेंभू योजना सुरू करण्याची मागणी होत आहे.
Waiting for the recurrence of the Tembhu scheme
Waiting for the recurrence of the Tembhu scheme

सांगली ः आटपाडी तालुक्यात तापमान वाढल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. बंधारे व तलावात पाणीसाठा कमालीचा घटला आहे. सध्या उन्हाळी हंगामासाठी टेंभू योजनेच्या पाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. टेंभू योजना सुरू करण्याची मागणी होत आहे.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील साठवण तलावात काही अंशी तर पाझर तलावाने कधीच तळ गाठला आहे.या आठवड्यात तापमान ३५ ते ३७ अंश झाल्यामुळे पाण्याच्या सर्वोच्च यंत्रणांवर परिणाम झाला आहे. परिणामी भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत टेंभू योजनेच्या पाण्यामुळे आणि कमीअधिक झालेल्या पावसामुळे स्थानिक ओढ्यांना पाणी वाहत राहिले होते. या वर्षी किरकोळ स्वरूपात पाऊस झाल्याने पाणीसाठा टिकला नाही. टेंभू योजनेचे पाणी उन्हाळी आवर्तन अद्याप सुरू झालेले नाही. 

आटपाडी तालुक्यातून जाणारा टेंभू योजनेचा मुख्य कालवा सांगोला व कवठेमहांकाळ तालुक्यात जातो. मात्र, अजून या मुख्य कालव्यास पाणी सोडण्यात आलेले नाही.टेंभू योजनेच्या खात्रीच्या पाण्यामुळे उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात बागायत क्षेत्र वाढलेले आहे. यामध्ये ऊस, फळबागा, भाजीपाला व इतर पिकांचे प्रमाण आहे. तापमान वाढीमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी घटत चालल्याने सर्वच शेतकऱ्यांच्या पाणी यंत्रणेवर परिणाम जाणवू लागला आहे.स्थानिक ओढ्यांना वाहत असलेले पाणी पूर्ण बंद झाले आहे.परिणामी ओढे नाले कोरडे पडले आहेत. उन्हाळी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 फायदा सर्वच शेतकऱ्यांना आटपाडी तालुक्यात बंदिस्त पाइपलाइन तालुक्याचा काही भाग वगळता सर्वत्र झालेली आहे. पाण्याचे आवर्तन सुरू झाल्यानंतर स्थानिक ओढ्यावर असणाऱ्या गेटमधून पाणी सोडण्यात येते. याचा फायदा सर्वच शेतकऱ्यांना होत आहे. त्याचबरोबर भूगर्भातील पाणीपातळी वाढून विहिरी व कूपनलिकांना त्याचा फायदा होतो. आता प्रतीक्षा टेंभू योजनेच्या आवर्तनाची आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com