Agriculture news in marathi Waiting for rotation from the Girna, Hatnur | Agrowon

गिरणा, हतनूरमधून आवर्तनाची प्रतीक्षा कायम 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

जळगाव ः दिवसागणिक उष्णता वाढत असून, गिरणा, तापी नदी काठच्या गावांमध्ये टंचाई वाढण्याची स्थिती आहे. गिरणा व तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी मागील महिनाभरापासून सुरू आहे. परंतु या प्रकल्पांमधून नदीत पाण्याचे आवर्तन सोडले जात नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. 

जळगाव ः दिवसागणिक उष्णता वाढत असून, गिरणा, तापी नदी काठच्या गावांमध्ये टंचाई वाढण्याची स्थिती आहे. गिरणा व तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी मागील महिनाभरापासून सुरू आहे. परंतु या प्रकल्पांमधून नदीत पाण्याचे आवर्तन सोडले जात नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. 

गावांतील विहिरींची घटलेली पातळी, पाणीटंचाईची शक्‍यता याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी गिरणा, हतनूर प्रकल्पातून आवर्तनाची मागणी केली आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी नदीत सोडण्यासंबंधी आदेश निर्गमीत करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

गिरणा नदीकाठच्या सुमारे १०० गावांमधील विहिरी, सार्वजनिक पाणीपुरवठा जलस्त्रोत आटू लागले आहेत. शिवारात केळी, लिंबू, मोसंबीच्या बागा आहेत. तापी नदीकाठीदेखील केळी व फळ पिकांची शेती आहे. शिवारातील कूपनलिका, विहिरींची जलपातळी घटत आहे. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. 

धुळे जिल्ह्यात पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पातून तातडीने पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी विविध गावांतील ग्रामपंचायतींसह राजकीय पक्ष, पदाधिकारी, संस्था, संघटनांतर्फे होत होती. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी अक्कलपाडातून आवर्तन सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले. यामुळे धुळे, शिंदखेडा व अमळनेर (जि. जळगाव) तालुक्‍यांतील नदीकाठच्या सुमारे ९० गावांना दिलासा मिळाला आहे. 

काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेला आहे. यामुळे रब्बी हंगामातील काही पिकांनाही पाण्याची आवश्‍यकता होती. तसेच पांझरा नदीकाठच्या धुळे, शिंदखेडा, अमळनेर तालुक्‍यांतील सुमारे ९० गावांच्या विहिरीही आटू लागल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. तसेच पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला होता. यामुळे अक्कलपाडातून त्वरित नदीपात्रात आवर्तन सोडावे, अशी आग्रही मागणी होत होती. या आवर्तनामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...