नगर जिल्ह्यात दोन वर्षांपासून ज्वारी पीक विम्याची प्रतीक्षा

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून (२०१८) रब्बी जिरायती ज्वारीचा पीक विमा मिळण्याची प्रतीक्षा असून विमा कधी मिळणार हे कृषी विभागातून सांगितले जात नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
Waiting for sorghum crop insurance for two years in Nagar district
Waiting for sorghum crop insurance for two years in Nagar district

नगर ः पंतप्रधान पीक विमा योजनेतून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन वर्षांपासून (२०१८) रब्बी जिरायती ज्वारीचा पीक विमा मिळण्याची प्रतीक्षा असून विमा कधी मिळणार हे कृषी विभागातून सांगितले जात नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर, दोन वर्षापूर्वीच्या ज्वारी पीक विम्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच शेतकऱ्यांना विमा मिळेल, असे कृषी विभागातून सांगितले जात आहे.

नगर जिल्ह्यात दोन २०१८ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेतून सुमारे एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांनी ज्वारीचा पीक विमा उतरवला होता. त्यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीचे नुकसान झाले. राज्यातील बहुतांश भागात शेतकऱ्यांना विमा मिळाला. मात्र नगर जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतकरी अद्यापही वंचित आहेत.

याबाबत शेतकरी कृषी विभागाकडे विचारणा करत आहेत. मात्र पुरेशी व ठोस माहिती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दोन वर्षांपूर्वीचा ज्वारीचा पीक विमा अजून मिळालेला नाही, असे कृषी विभागातून अधिकाऱ्यांनी सांगितले. काही तांत्रिक बाबींमुळे हा विमा रखडला असून लवकरच तो शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.   

ग्रामपंचायत स्तरावर कापणी प्रयोग पीकविम्यासह इतर बाबींसाठी दरवर्षी कृषी विभागामार्फत महसूल मंडळात बारा पीक कापणी प्रयोग राबवले जातात. दोन वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर चार पीक कापणी प्रयोग करण्याचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग राबवला. त्यावर्षी जिल्ह्यात ५ हजार २९२ पीक कापणी प्रयोग राबवले. त्यामुळे काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्या असून त्यामुळे पीक विमा रखडला असल्याचे सांगितले जात असले तरी त्याबाबत अधिकृत विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी विभागाचे अधिकारी सांगत नाहीत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com