कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात परिपत्रकही निघाले. या संबंधी शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रेही जमा करण्यात आली. तरी शेतकऱ्यांच्या पदरात अनुदान पडलेले नाही. ऐन खरिपाच्या तोंडावर पैशांची अडचण असताना अनुदान भेटणार कधी हा सवाल कांदा उत्पादक करत आहेत. त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या बाबतीत मदतीऐवजी प्रतीक्षा वाट्याला आली आहे.

कांदा अनुदानाची मिळालेली रक्कम भांडवल म्हणून खरिपासाठी उपयोगी पडेल या आशेने शेतकरी अनुदानाची वाट पाहत असताना या बाबत कामकाज थंड आहे. त्यामुळे चालू खरीप हंगामातील पिकांसाठी भांडवल कसे उभे करावे, खते, बी-बियाणे, मशागत यासाठी भांडवल कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या दरम्यान पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधून ७१४३८ लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यासाठी एकूण ५४ कोटी १४ लाख ९३ हजर ५८८ रुपये अनुदान वितरित करण्यात आले, मात्र दुसऱ्या टप्प्यातील १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान विक्री झालेल्या कांद्याचे अनुदान अजूनही प्रलंबित आहे.

१६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान विक्री झालेल्या कांद्याचे अनुदानासाठी जिल्ह्याभरातून बाजार समित्यांमार्फत १ लाख ९१ हजार ११५ अर्ज छाणनीनंतर निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी १९९ कोटी ५७ लाख २ हजार ५०८ रुपयांची आवश्यकता आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यभर देत असलेल्या एकूण कांदा अनुदानापैकी नाशिक जिल्ह्याचा वाटा ६० टक्के आहे.

जिल्ह्यातील कांदा अनुदानाबाबत संकलित झालेली एकूण माहिती पणन संचालनालयाकडे जमा केली आहे. ती माहिती पुढे शासनाकडे पाठवली आहे. अनुदान नक्की कधी मिळेल हे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही. याबाबत कार्यवाही सुरू आहे. - गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, नाशिक

कांद्याचे भाव पडल्याने मागील वर्षांपासून मोठा आर्थिक अडचण आहे. त्यामुळे दुष्काळात जगणे कठीण झाले आहे. पेरणीच्या तोंडावर सरकारने लवकर मदत घ्यावी. नाहीतर या हंगामात भांडवल कसे उभारायचे हा मोठा प्रश्न आहे. - बाबासाहेब पवार, कांदा उत्पादक शेतकरी, कोळगाव, ता. येवला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com