Agriculture news in Marathi, Waiting for subsidies for onion-producing farmers | Agrowon

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 जून 2019

नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात परिपत्रकही निघाले. या संबंधी शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रेही जमा करण्यात आली. तरी शेतकऱ्यांच्या पदरात अनुदान पडलेले नाही. ऐन खरिपाच्या तोंडावर पैशांची अडचण असताना अनुदान भेटणार कधी हा सवाल कांदा उत्पादक करत आहेत. त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या बाबतीत मदतीऐवजी प्रतीक्षा वाट्याला आली आहे.

नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने कांद्याला प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात परिपत्रकही निघाले. या संबंधी शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रेही जमा करण्यात आली. तरी शेतकऱ्यांच्या पदरात अनुदान पडलेले नाही. ऐन खरिपाच्या तोंडावर पैशांची अडचण असताना अनुदान भेटणार कधी हा सवाल कांदा उत्पादक करत आहेत. त्यामुळे शेतकरी अनुदानाच्या बाबतीत मदतीऐवजी प्रतीक्षा वाट्याला आली आहे.

कांदा अनुदानाची मिळालेली रक्कम भांडवल म्हणून खरिपासाठी उपयोगी पडेल या आशेने शेतकरी अनुदानाची वाट पाहत असताना या बाबत कामकाज थंड आहे. त्यामुळे चालू खरीप हंगामातील पिकांसाठी भांडवल कसे उभे करावे, खते, बी-बियाणे, मशागत यासाठी भांडवल कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याच्या कवडीमोल भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांदा अनुदान तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या दरम्यान पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधून ७१४३८ लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यासाठी एकूण ५४ कोटी १४ लाख ९३ हजर ५८८ रुपये अनुदान वितरित करण्यात आले, मात्र दुसऱ्या टप्प्यातील १६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान विक्री झालेल्या कांद्याचे अनुदान अजूनही प्रलंबित आहे.

१६ डिसेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान विक्री झालेल्या कांद्याचे अनुदानासाठी जिल्ह्याभरातून बाजार समित्यांमार्फत १ लाख ९१ हजार ११५ अर्ज छाणनीनंतर निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी १९९ कोटी ५७ लाख २ हजार ५०८ रुपयांची आवश्यकता आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यभर देत असलेल्या एकूण कांदा अनुदानापैकी नाशिक जिल्ह्याचा वाटा ६० टक्के आहे.

जिल्ह्यातील कांदा अनुदानाबाबत संकलित झालेली एकूण माहिती पणन संचालनालयाकडे जमा केली आहे. ती माहिती पुढे शासनाकडे पाठवली आहे. अनुदान नक्की कधी मिळेल हे खात्रीशीरपणे सांगता येणार नाही. याबाबत कार्यवाही सुरू आहे.
- गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, नाशिक

कांद्याचे भाव पडल्याने मागील वर्षांपासून मोठा आर्थिक अडचण आहे. त्यामुळे दुष्काळात जगणे कठीण झाले आहे. पेरणीच्या तोंडावर सरकारने लवकर मदत घ्यावी. नाहीतर या हंगामात भांडवल कसे उभारायचे हा मोठा प्रश्न आहे.
- बाबासाहेब पवार, कांदा उत्पादक शेतकरी, कोळगाव, ता. येवला

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...