बुलडाणा जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

बुलडाणा जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत
बुलडाणा जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

बुलडाणा ः जिल्ह्यातील सव्वाशेपेक्षा अधिक रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. नागपूर येथे रेशीम विभागाच्या प्रकल्प सनियंत्रण समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता.२७) बैठक होत असून यात अनुदानाच्या मुद्यावर चर्चा होऊन तोडगा निघण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना अाहे.

शेतकऱ्यांना पारंपरिक शेती परवडत नसल्याने त्यांना पूरक व्यवसाय करण्याचा सल्ला दिला जातो. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेतीची निवड केली. मात्र अातापर्यंत शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने त्यांची पायपीट सुरू अाहे. शेतकऱ्यांनी जिल्हा कार्यालयापासून रेशीम विभागाच्या मुख्य कार्यालयापर्यंत भेटी घेऊन अधिकाऱ्यांना निवेदने दिली. परंतु, याबाबत अातापर्यंत काहीही निर्णय होऊ शकलेला नाही.जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या सिल्क समग्र योजनेअंतर्गत तुतीची लागवड करण्यासाठी पुढाकार घेतला.

लागवड करण्यापूर्वी या शेतकऱ्यांना रेशीम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट घेत प्रोत्साहित केले. मनरेगामध्ये जे शेतकरी बसत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना असून, या योजनेतून दोन एकरांपेक्षा कमी लागवड करता येणार नाही, अशी माहिती रेशीम अधिकाऱ्यांनी भेटी दरम्यान शेतकऱ्यांना दिली होती. तसेच या शेतकऱ्यांकडून दोन ते पाच एकर लागवडीसाठी प्रति एकर एक हजार रुपये नोंदणी शुल्क त्या वेळी घेण्यात अाले.

शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार करून घेण्यात अाले. शेतकऱ्यांनी अापल्याकडे असलेले भांडवल व बागायती शेती ही रेशीम उद्योग लागवडीसाठी वापरलेली अाहे. १३४ शेतकऱ्यांनी ३२४ एकरांवर या योजनेच्या माध्यमातून तुती लागवड केली आहे. दरम्यानच्या काळात या योजनेच्या अनुषंगाने जाहिरात देण्यात अाली. त्यात लाभार्थ्यांची निवड सोडतीद्वारे करण्याचे जाहीर केले. यामुळे हे लागवड केलेले शेतकरी हादरले.

लाभार्थी निवडण्यासाठी सोडत किंवा पद्धत कशी असेल, ही माहिती या कार्यालयाने अाधीच निश्चित करण्याची गरज होती, अशा आशयाचे निवेदन रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी दिले अाहे. याला एक महिना लोटला अाहे. अाजवर कुठलाही दिलासा मिळाला नाही. मंगळवारी प्रकल्प सनियंत्रण समितीची बैठक होत असून त्यात तोडगा निघेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत अाहेत.   

असे मिळते अनुदान रेशीम उत्पादकाला तुती लागवडीसाठी एकरी ३७ हजार ५००, ठिबकसंच बसविण्यासाठी ३७ हजार ५०० रुपये अनुदान मिळणार होते. सााहित्यासाठी ५२ हजार रुपये अनुदानाची तरतूद अाहे. याशिवाय रेशीम उत्पादनाच्या अनुषंगाने गोदाम बांधण्यासाठी १ लाख २६ हजार रुपये अनुदान दिले जाईल, असे शेतकरी सांगत अाहेत. हे सर्व अनुदान देण्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मागणी होत अाहे. जिल्ह्यातील रेशीम उत्पादकांच्या मागण्या तुती लागवड, ठिबक सिंचन, कीटक संगोपन गृह व साहित्य योजनेचा लाभ पूर्ण द्यावा. केंद्र व राज्यशासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून द्यावा. सध्या असलेल्या निधीतून शक्य तितक्या शेतकऱ्यांना अनुदान तातडीने द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com