सांगलीत टप्पा चार, पाचकडे पाण्याची प्रतीक्षा

Waiting for water on stage four, five in Sangli
Waiting for water on stage four, five in Sangli

लेंगरे, जि. सांगली : टेंभूचे आर्वतन अखेर पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे. माहुलीतील टप्पा क्रमांक तीनच्या पंपहाऊसपर्यंतही पाणी आले. मात्र, माहुलीपुढे टप्पा क्रमांक चार, पाचकडे पाणी कधी पोचणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.  

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कधी पाणी मिळणार, याकडे डोळे लागले आहेत. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांना पाणी देणे जिकिरीचे झाले आहे. लवकर पाणी दुष्काळी भागाकडे सूत्रसंचालन सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. टेंभूचे पाणी माहुली पंपहाऊसमध्ये दाखल झाले. पंपगृहाऊसमधील पंप सुरू झाले. पाणी पुढे दुष्काळी भागाकडे सरकेल, अशी आशा होती. मात्र आशेवर पाणी फिरले. टेंभूचे पाणी पंपहाऊसमध्ये आले खरे, मात्र पुढे सोडण्यास पुरेसे क्षमतेने पाणी येत नाही.  माहुली ओढ्यात पाणी सोडून चिखलहोळ बंधारा भरण्याचे  काम सुरू आहे. येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. 

 या पंपहाऊसमधून पुढील पंपगृहाकडे जाईल एवढा पाणीसाठा होत नसल्याने पुढील टप्पा चार, पाचच्या पंपहाऊसकडे पाणी जाण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. 

टेंभूच्या पाण्यावर ऊस, मका, भुईमूग, द्राक्ष, डाळिंबांची लागण मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यापूर्वीचे टेंभूचे आवर्तन वेळेत झाल्यामुळे शाश्वत पाणी मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी पिके घेण्यास सुरुवात केली. मात्र उन्हाळी आवर्तन वेळेत न झाल्याने ओढे-नाले कोरडे ठणठणीत आहेत. कूपनलिका, विहिरींची पाणीपातळी खालावल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com