agriculture news in marathi, wall acquisition proposal status, amaravati, maharashtra | Agrowon

अमरावतीतून ९१ विहिरी अधिग्रहणाचे प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 एप्रिल 2019

अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ९१ खासगी विहिरींच्या अधिग्रणहणाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. 

अमरावती  ः सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ९१ खासगी विहिरींच्या अधिग्रणहणाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. 

जिल्हा प्रशासनाच्या संयुक्‍त कृती आराखड्यानुसार यंदा एप्रिल ते जून या कालावधीत २८३ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण आहे. यासाठी सद्यःस्थितीत जिल्हा प्रशासनाकडे खासगी विहिरी अधिग्रहणाचे ९१ प्रस्ताव ३१ मार्चपर्यंत प्राप्त झाले आहेत. विंधन विहिरींसाठी १४५ प्रस्ताव मिळाले आहेत. यामध्ये १३० प्रस्ताव हे ३१ मार्चपर्यंत तर उर्वरित प्रस्ताव १० एप्रिलला प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. सद्यःस्थितीत जिल्हयात शासकीय पाच व खासगी सहा अशा एकूण ११ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

एप्रिल ते जून या कालावधीत ८२ विहिरींमधील गाळ काढून त्यांचे खोलीकरण करण्यात येणार आहे. यावर सुमारे २४.६० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १८९ नवीन विंधन विहिरी व कूपनलिका तयार करण्यात येणार आहे. त्यावर १ कोटी ८८ लाख खर्च अपेक्षित आहे. पाणीटंचाईच्या तिसऱ्या टप्प्यात ३६९ उपाययोजना करण्यात येणार आहे. यावर एकूण २ कोटी ९२ लाख ६० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

विहिरी अधिग्रहणाची स्थिती  ः चांदूररेल्वे ः २३, मोर्शी ः १७, अचलपूर ः १५, अमरावती ः १२, तिवसा ः ९, नांदगाव खंडेश्‍वर ः ७, चिखलदरा ः ५, भातकुली ः १, धामणगाव रेल्वे ः १, अंजनगावसूर्जी ः १.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...