agriculture news in marathi Walpapadi, Ghewadyachi in Nashik Inflows decreased; Increase in rates | Agrowon

नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक घटली; दरात वाढ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 जून 2021

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात वालपापडी- घेवड्याची आवक ९०१ क्विंटल झाली. सध्या आवक कमी झाली आहे. दरात वाढ झाल्याचे दिसून आले.

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात वालपापडी-घेवड्याची आवक ९०१ क्विंटल झाली. सध्या आवक कमी झाली आहे. दरात वाढ झाल्याचे दिसून आले. वालपापडीला प्रतिक्विंटल ५,००० ते १३,००० रुपये, तर सरासरी दर ९००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल ६,००० ते १२,०००, तर सरासरी १०,००० रुपये दर राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये उन्हाळ कांद्याची आवक २०५७० क्विंटल झाली. आवकेत वाढ झाल्याचे दिसून आले.  त्यास प्रतिक्विंटल ८५० ते २०००, तर सरासरी दर १५०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ४८५८  क्विंटल, तर दर प्रतिक्विंटल ४०० ते १२५०, सरासरी ८०० रुपये राहिला. लसणाची आवक ३६२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ८०००, तर सरासरी दर ५५०० रुपये राहिला. आल्याची आवक ८८० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ३२५१, तर सरासरी दर २७५० रुपये राहिला.

काही फळभाज्यांची आवक कमी जास्त होत आहे. त्यांच्या दरातही चढ-उतार दिसून आले. हिरव्या मिरचीची आवक २०२३ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २५०० ते ४०००, तर सरासरी दर ३५०० रुपये राहिला. गाजराची आवक ४३९६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५००, तर सरासरी दर २००० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला ५० ते २२५, तर सरासरी १७०, वांग्यांना ४०० ते ८००, तर सरासरी ६०० व फ्लॉवरला ४० ते १७० आणि सरासरी ९० रुपये दर प्रति १४ किलोस मिळाले. कोबीला १४० ते २२०, तर सरासरी १७० रुपये, ढोबळी मिरचीला २५० ते ३२५, तर सरासरी दर ३०० रुपये दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २०० ते ४००, तर सरासरी ३००, कारले ४०० ते ५५०, तर सरासरी ४५०, गिलके ४०० ते ५५०, तर सरासरी ४७५ व दोडका ७०० ते ९००, तर सरासरी दर ८०० रुपये प्रति १२ किलोस मिळाले. 

फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबांची आवक ५६८६ क्विंटल झाली. मृदुला वाणास ४०० ते ८७५०, तर सरासरी ५००० रुपये दर मिळाला. आवक वाढल्याने दर कमी झाले. केळीची आवक १०४० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १२५०, तर सरासरी दर १००० रुपये मिळाला. आंब्यांची आवक २६९९ क्विंटल झाली. 


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...
सोलापुरात डाळिंबाला उठाव; दरात सुधारणासोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये वाटाण्याच्या आवेकसह दरातही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
नगरमध्ये फ्लॉवर, दोडक्याच्या दरात तेजीनगर : ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
उडदाचा दर ६ हजार; सोयाबीन ८ हजाराच्या...लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
राज्यात उडीद ३३०१ ते ७०१० रुपयेहिंगोलीत प्रतिक्विंटल ५५९५ रुपयांचा दर हिंगोली...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट...नाशिक : नाशिक बाजार समितीत गत सप्ताहात हिरव्या...
नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक...नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात गवार, भेंडी, वांग्यांना...सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ४०० ते १५५०...औरंगाबाद येथे सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटललातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये  लातूर :...
औरंगाबादमध्ये बटाटे स्थिर, वांगी, मिरची...औरंगाबादमध्ये : भाजीपाल्याचे दर सगळीकडेच...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक, दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये उडदाला ५००० ते ६८०० रुपयेनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
सोलापुरात उडीद, मुगाला उठाव, दरही तेजीतसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
शेतमाल आवक वाढली, मागणी घटली, दर स्थिर पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...