वाळवा, शिराळ्यात आंदोलन पेटले

वाळवा, शिराळ्यात आंदोलन पेटले
वाळवा, शिराळ्यात आंदोलन पेटले

सांगली ः  वाळवा, शिराळा तालुक्‍यांत मराठा आरक्षण मोर्चाची धग गुरुवारी (ता. २६) सकाळपासून वाढली. एसटी बसला लक्ष्य करीत आंदोलकांनी तोडफोड केली. तर शिराळा तालुक्‍यातील मांगले येथे जमावाने एसटी बस पेटवल्याने शिराळा तालुक्‍यातही तणावाचे वातावरण आहे. अनेक गावांत उत्स्फूर्त बंद पाळला जात आहे.

शिराळा तालुक्‍यातील मांगलेत जमावाने सकाळी सोडेदहा-अकराच्या सुमारास बस पेटवली. यात बस जळून खाक झाली आहे. गेले दोन दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेले शिराळा, वाळवा तालुक्‍यांतील आंदोलन तोडफोडीचे लक्ष्य बनले. एसटीला लक्ष्य केल्याने प्रवासी भयभीत झाले आहेत. आज सकाळी ११ वाजता ताकारी-इस्लामपूर रस्त्यावर इस्लामपूरकडे येणाऱ्या पलूस-इस्लामपूर, रेठरे हरणाक्ष-इस्लामपूर या इस्लामपूर व पलूस आगारांच्या तीन बस आंदोलकांनी शिंदे मळा ते वीट भट्टी यादरम्यान फोडल्या.

एसटीच्या पाठीमागील मोठ्या दोन काचा व बाजूच्या खिडक्‍या फुटल्या. खळ्ळखट्याकच्या आवाजाने प्रवासी भयभीत झाले. त्यांनी दरवाजा उघडून खाली धाव घेतली. घटनास्थळावर बघ्यांनी गर्दी केली होती. चालक-वाहकांनी इस्लामपूर आगार व पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. दरम्यान शिराळा तालुक्‍यात आंदोलकांनी एसटीला लक्ष्य करीत मांगलेमध्ये एसटी बस पेटवल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने एसटीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद केली. कडेगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी (ता. २७) कडेगाव तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार येथील मराठा समाजाने केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com