Agriculture news in Marathi The wandering aarti of those who move out without reason | Agrowon

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची ओवाळली आरती

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

अकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली आहे. अशा स्थितीतही काही नागरिक खुलेआम रस्त्यांवर फिरताना दिसतात. वारंवार विनवण्या करूनही फारसा फरक होत नसल्याने आता गावकरी वेगवेगळ्या शक्कल लढवू लागले आहेत. गुरुवारी (ता. दोन) जिल्ह्यांतील दहिगाव गावंडे ग्रामपंचायतीने लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या गावकऱ्यांची थेट पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळत गांधीगिरी केली. 

अकोला ः ग्रामीण भागात ‘कोरोना’ची धास्ती वाढलेली आहे. अशा स्थितीतही काही नागरिक खुलेआम रस्त्यांवर फिरताना दिसतात. वारंवार विनवण्या करूनही फारसा फरक होत नसल्याने आता गावकरी वेगवेगळ्या शक्कल लढवू लागले आहेत. गुरुवारी (ता. दोन) जिल्ह्यांतील दहिगाव गावंडे ग्रामपंचायतीने लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या गावकऱ्यांची थेट पारंपरिक पद्धतीने आरती ओवाळत गांधीगिरी केली. 

दहिगाव गावंडे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि तंटा मुक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी या अनोख्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. राज्यात ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारने संपूर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु तरीही याचे उल्लंघन करीत काही जण घरांबाहेर पडत आहेत. काम नसताना विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची गर्दी होत आहे. यावर दहिगाव गावंडे येथील काही सुजाण गावकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवली. 

बाहेर पडून गर्दी करणाऱ्या नागरिकांची थेट आरती ओवाळून घरात राहण्याचा सल्ला देत अनोखी गांधीगिरी केली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, ओट्यावर पारावर बसू नये यासाठीआरती ओवाळली व बाहेर न पडण्याचे आवाहनही केले. या अनोख्या गांधीगिरीमुळे नागरिकांनी घरी काढता पाय घेतला. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय गावंडे, ग्रामपंचायत कर्मचारी विनायक गावंडे, बाबूराव गावंडे, ॲड. जयेश गावंडे, सचिन बडोदे, उमेश गावंडे आदिंनी पुढाकार घेतला.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...