agriculture news in marathi, Wandering for water in Aurangabad district | Agrowon

औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२ वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावे - वाड्यांमधील जवळपास १८ लाख ९३ हजार ७१४ लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टंचाईग्रस्तांची तहान भागविण्यासाठी प्रशासनातर्फे ११७० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२ वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावे - वाड्यांमधील जवळपास १८ लाख ९३ हजार ७१४ लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टंचाईग्रस्तांची तहान भागविण्यासाठी प्रशासनातर्फे ११७० टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

भूपृष्ठावरील आटलेले पाणीसाठे, भूजलाची खालावलेल्या पातळीमुळे जिल्ह्यातील पाणीसंकट अधिकच तीव्र आहे. गतवेळच्या पावसाळ्यात अपेक्षेच्या तुलनेत जिल्ह्यात ६० टक्‍केच पाउस पडला. त्यानंतर परतीच्या पावसानेही जिल्ह्यात दांडी मारली. शिवाय यंदा जून अर्धाअधिक लोटला. तरीही जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीसंकट दिवसेंदिवस भीषण होत आहे. 

जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत पाणी नाही. दुसरीकडे पैठण तालुक्‍यातील जायकवाडी मृत साठ्यात आहे. टॅंकरसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या तालुक्‍यातील १४५ गावे, ४१ वाड्यांना १८२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ३० विहिरींचे टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. 

औरंगाबाद तालुक्‍यातील १३७ गावे, ४५ वाड्यांत पाणीटंचाई आहे. या गाव-वाड्यांमधील ४ लाख ६ हजार ३७२ लोकांसाठी १९४ टॅंकर सुरू आहेत. जिल्ह्यातील १६ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. वैजापूर तालुक्‍यातील १२७ गावे, १९ वाड्यांसाठी १८८ टॅंकर आहेत. ११२ विहिरी अधिग्रहित आहेत. पैठण तालुक्‍यातील १०० गावे, ३१ वाड्यांची तहान टॅंकरशिवाय भागत नाही. त्यासाठी १३८ टॅंकर सुरू आहेत. ७ विहिरी अधिग्रहित आहेत. 

पाणीटंचाईचे भीषण संकट  

सिल्लोड तालुक्‍यातील ९६ गावे, ९० वाड्यांत भीषण जलसंकट आहे. त्या ठिकाणी १९४ टॅंकर सुरू आहेत. १०८ विहिरी अधिग्रहित आहेत. फुलंब्री तालुक्‍यातील ७२ गावे, २ वाड्यांसाठी १२२ टॅंकर सुरू आहेत.

इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...