जळगावात वांगी १४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात वांगी १४०० ते २८००  रुपये प्रतिक्विंटल
जळगावात वांगी १४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ९) वांग्यांची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १४०० ते २८०० रुपये दर मिळाला. हिरव्या, लहान व काटेरी प्रकारच्या वांग्यांचे दर २७०० रुपयांपुढे आहेत. वांग्यांची आवक पाचोरा, जामनेर, एरंडोल, जळगाव आदी भागातून झाली. आवक कमी असून, दर स्थिर आहेत, अशी माहिती मिळाली.  

बाजारात शेवग्याची अडीच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५५० ते २५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची १४ क्विंटल आवक झाली. दर ८०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. बिटची सहा क्विंटल आवक झाली. त्याला प्रतिक्विंटल १४०० ते २४०० रुपये दर मिळाला. मेथीची सात क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर होता. 

गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २२०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. संकरित प्रकारच्या गवारीचे दर कमाल २६०० पर्यंत राहिले. लिंबूची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ३२०० रुपये दर होता. आल्याची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ५२०० रुपये दर मिळाला. बटाट्याची ३१० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ६०० ते ११५० रुपये दर होता. भेंडीची १० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० ते १७५० रुपये मिळाला. 

काशीफळाची ३३ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये होता. कोबीची १४ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० ते २६०० रुपये मिळाला. गाजराची ११ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची १४ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये दर होता.

पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १४०० रुपये दर मिळाला. डाळिंबाची १७ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २४०० ते ५०५० रुपये दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com