जळगावात भरताची वांगी ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल

जळगावात वांगी ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल
जळगावात वांगी ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.४) भरताच्या वांग्याची २७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये असा मिळाला. दरात चढउतार सुरू आहे. आवक भुसावळ, यावल, जळगाव, जामनेर आदी भागातून होत आहे. बाजारात आल्याची २१ क्विंटल आवक झाली. आल्यास प्रतिक्विंटल २२०० ते ४८०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाला. बिटची सहा क्विंटल आवक झाली. बिटला प्रतिक्विंटल १५०० ते २४०० रुपये दर मिळाला. लिंबूची पाच क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाला. गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ४००० रुपये मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ११०० ते १७०० रुपये दर होता. डाळिंबाची १८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २२०० ते ५००० रुपये दर मिळाला. बिटची सहा क्विंटल आवक झाली. पालकची दोन क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची आठ क्विंटल आवक झाली, त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर मिळाला. कोबीची २० क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ९०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ९०० ते १४०० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली, दर प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये मिळाला. टोमॅटोची २१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com