नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल

नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल
नाशिकमध्ये वांगी १३०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वांग्यांची २१२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १३०० ते ३००० असा, तर सरासरी २३५० रुपये दर मिळाला.  

बाजारात फ्लॉवरची आवक २४३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४२५ ते १५०० दर मिळाला. सरासरी दर ११४० रुपये राहिला. कोबीची आवक ११२० क्विंटल झाली. तिला सरासरी ७०८ ते १९५८ असा दर होता. सर्वसाधारण दर १५८० राहिले. ढोबळी मिरचीची आवक २२० क्विंटल झाली. तिला ११२५ ते २००० दर होता. सर्वसाधारण दर १६२५ राहिला. पिकॅडोरची आवक २९ क्विंटल झाली. तिला १०६२ ते १८७५, तर सर्वसाधारण दर १५०० रुपये राहिला. 

भोपळ्याची आवक ७०१ क्विंटल झाली. त्यास २६६ ते १८७५ असा दर होता. सर्वसाधारण दर १५०० राहिला. कारल्याची आवक ३३८ क्विंटल झाली. त्यास ४१६ ते १००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०५ राहिला. दोडक्याची आवक १२१ क्विंटल झाली. त्यास ७५० ते १६६० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर १२०८ राहिला. गिलक्याची आवक ३८ क्विंटल होती. त्यास १००० ते १५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला. भेंडीची आवक ३८ क्विंटल झाली. त्यास १००० ते २२०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १८७५ राहिला.

गवारीची आवक ५० क्विंटल झाली. तिला २००० ते ५००० असा दर होता. सर्वसाधारण दर ३००० रुपये राहिला. डांगराची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १२०० रुपये, सर्वसाधारण दर १००० रुपये राहिला. काकडीची आवक १२० क्विंटल झाली. तिला ३७५ ते ७५० असा दर होता. सर्वसाधारण दर ६५० रुपये राहिला.

लिंबाची आवक १२ क्विंटल झाली. त्यांना १७०० ते ४२५० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २८७५ राहिला. बटाट्याची आवक ११८९ क्विंटल झाली. त्यास ६०० ते १२०० दर होता. सर्वसाधारण दर ९०० रुपये राहिला. कांद्याची आवक २४६५ क्विंटल झाली. त्यांना २००० ते २३७५, तर सर्वसाधारण दर २१०० रुपये राहिला. लसणाची आवक २३ क्विंटल झाली. सर्वसाधारण दर ४००० ते १६००० दरम्यान होता. सरासरी दर १३००० रुपये मिळाला. 

फळांमध्ये पेरूची आवक ९ क्विंटल झाली. त्यास १६२५ ते ३१२५ दर मिळाला. सर्वसाधारण दर २८७५ राहिला. डाळिंबाची आवक १९६३ क्विंटल झाली. त्यास ४५० ते ४७५० दर होता. सर्वसाधारण दर ३२५० राहिला. केळीची आवक ६० क्विंटल झाली. तिला ५०० ते ११०० सर्वसाधारण दर मिळाला. सरासरी भाव ८०० रुपये राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com