इनामी, वक्फ जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करा

इनामी, वक्फ जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करा
इनामी, वक्फ जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करा

परभणी ः देवस्थानच्या इनामी तसेच वक्फ जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जासह अन्य शासकीय योजनांचा लाभ घेता येत नसल्याने या शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या जमिनी खालसा करून त्या पिढ्यान् पिढ्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात, अशी मागणी सोमवारी (ता. २९) अखिल भारतीय किसान सभेतर्फे परभणी येथे आयोजित देवस्थान इनाम, वक्फ जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मराठवाडा विभागीय मेळाव्यामध्ये करण्यात आली.

याप्रश्नी २० आॅगस्ट रोजी औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा या मेळाव्यात करण्यात आली.

अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सहसचिव कॉम्रेड विलास बाबर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. कार्याध्यक्ष कॉम्रेड अर्जुन आडे, उमेश देशमुख, उत्तम माने, गोविंद आर्द्रड, इलियास खतिब यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी कॉम्रेड उमेश देशमुख म्हणाले, ‘‘राज्यातील विविध देवस्थाने, वक्फ बोर्डाच्या जमिनी अनेक शेतकरी अनेक पिढ्यांपासून कसत आहेत. परंतु, सरकारने या जमिनी खासगी कंपन्यांना देऊन शेतकऱ्यांना बेदखल करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या जमिनीचे मालक कसणारे शेतकरी आहेत. या जमिनी खालसा करून संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात.’’

कॉम्रेड बाबर म्हणाले, ‘‘इनामी जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी एकजुटीने एकत्र यावे. औरंगाबाद येथे २० आॅगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे.’’

प्रास्ताविक इलियास खतिब यांनी केले. सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले. गोविंद आर्द्रड यांनी आभार मानले. या मेळ्यास परभणी, नांदेडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com