agriculture news in marathi Ward base vegetable distribution will be done in Pune City | Agrowon

पुण्यात मिळणार वॉर्डनिहाय भाजीपाला; गर्दी टाळण्यासाठी नियोजन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 मार्च 2020

पुणे  : कोरोना विषाणूच्या संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भावापासूनच्या बचावासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे शहरातील भाजीपाल्याची टंचाई जाणवू नये म्हणून प्रभाग किंवा वॉर्डनिहाय भाजीपाला विक्री केंद्रे सुरू होणार आहेत. पुणे बाजार समितीच्या सहकार्याने किमान १०० विक्री केंद्रे सुरू होणार आहे. 

पुणे  : कोरोना विषाणूच्या संसर्ग, फैलाव आणि प्रादुर्भावापासूनच्या बचावासाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे शहरातील भाजीपाल्याची टंचाई जाणवू नये म्हणून प्रभाग किंवा वॉर्डनिहाय भाजीपाला विक्री केंद्रे सुरू होणार आहेत. पुणे बाजार समितीच्या सहकार्याने किमान १०० विक्री केंद्रे सुरू होणार आहे. 

यासाठीच्या नियोजनाची बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, कृषी आयुक्त सुहास दिवसे, महानगरपालिका उपायुक्त (अतिक्रमण) माधव जगताप, पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख आदी उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे शहरात भाजीपाला उपलब्ध होण्यास काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशातच भाजीपाल्याचे दर विक्रेत्यांनी भडकवल्याने ग्राहकांना तो महाग खरेदी करावा लागत आहे. आणखी किमान महिनाभर संचारबंदी सदृश परिस्थिती राहणार असल्याच्या शक्यतेने शहरात भाजीपाल्याचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी विक्री केंद्रे निर्माण होण्याची गरज वर्तविण्यात येत होती. 

याबाबत बोलताना पुणे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले,‘‘लॉकडाऊनचे दिवसांचा विचार करता आणि भविष्यातील हे दिवस वाढीच्या शक्यतेने बाजार समितीमध्ये कमीत कमी गर्दीत आणि सोशल डिस्टिनिंगची शिस्त पाळत बाजार सुरू ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. यासाठी पुन्हा आडते असोसिएशन, मर्चंट चेंबर, कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यांना कमीत कमी गर्दीत कमीत कमी घटकांमध्ये बाजार सुरू ठेवण्याच्या उपाययोजनांची माहिती दिली. यानुसार ते उद्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सांगणार आहेत. त्यामुळे बाजार समिती लवकरात लवकर सुरू होऊन, शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.‘‘

दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या सहयोगाने प्रभाग किंवा वॉर्डनिहाय भाजीपाला केंद्रे सुरू करण्याचे नियोजन मनपा आणि आम्ही करत आहोत. आम्हांला वॉर्ड निहाय भाजीपाल्याची  मागणी आदल्या दिवशी दिल्यास आम्ही पहाटे हा भाजीपाला वॉर्डनिहाय पुरवठा करू, याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. 

शहरातील भाजीपाला पुरवठा मुबलक आणि सुरळीत होण्यासाठी पालिका, बाजार समिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहकार्याने शहरात वॉर्डनिहाय १०० भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करत आहोत. यासाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित केला जाईल. या क्रमांकावर नागरिकांनी त्यांचा रहिवासी भाग,पेठे, सोसायटीसह भाजीपाल्याची नोंदणी केल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या मागणीचे पार्सल पुरविले जाईल.अशी व्यवस्था करत आहोत.
- माधव जगताप, उपायुक्त (अतिक्रमण), मनपा, पुणे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सकस चाऱ्यासाठी पेरा बाजरी,मकाजनावरांच्या पोषणामध्ये हिरवा चारा महत्वाचा आहे....
उन्हाळी चारा मका पिकातील लष्करी अळीचे...बऱ्याच भागांमध्ये चाऱ्यासाठी उन्हाळ्यात मका...
हवामान सुसूत्रीकरण करणारी जागतिक हवामान...पृथ्वीच्या बदलत्या वातावरणामध्ये तापमान वाढीसोबतच...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
मोबाईल ‘ॲप’द्वारे मिळणार कोरानाविषयीची...जिनिव्हाः जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू...
कांदा साठवणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चार दिवसांपासून अवकाळी...
नगर बाजारसमितीत भाजीपाला खरेदी-विक्री...नगर  ः नगर शहरात भाजीपाला, फळांची मागणी आणि...
नगर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरुचनगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीची घडी...अकोला  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
सूचनांचे पालन न केल्यास दंड आकारण्याचे...पुणे  ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या...