वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा कोटी ः बावनकुळे

वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा कोटी ः बावनकुळे
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा कोटी ः बावनकुळे

वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण रस्त्यांची भूमिका मोठी राहते. त्यामुळेच शेतीच्या वहिवाटीसाठी असणाऱ्या पांदणरस्ते विकासावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी पांदणरस्ते विकासासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती ऊर्जामंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार रामदास तडस, आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, मुख्य काय्रकारी अधिकारी सचिन ओंबासे, जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर तसेच विभागप्रमुख व तहसीलदार उपस्थित होते. 

चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्याचा वार्षिक आराखडा २५० कोटी रुपयांपर्यंत करण्याचे नियोजन आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांचे आराखडे सुधारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा विकास आराखड्यातून होणाऱ्या सर्व विकासकामांचे छायाचित्र आणि व्हिडिओ तयार करून ठेवावेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अनेक गावांत बस जात नाही. त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. हा मुद्दा या वेळी आमदार पंकज भोयर यांनी उपस्थित केला. यावर पुढील १५ दिवसांत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि रस्ते दुरुस्त करावेत,’’ असे निर्देशही बावनकुळे यांनी संबंधित विभागाला दिले. 

जिल्हा परिषद आणि नगर परिषदअंतर्गत झालेल्या पाच वर्षांतील कामांचे परीक्षण करण्यासाठी चमू पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी भिमनवार यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान, पीकपरिस्थिती, धरणांची स्थिती, पाणी पातळी, पुरामुळे व अतिवृष्टीमुळे झालेली मनुष्यहानी, घर, जनावरे आदींचे नुकसान आणि दिलेले आर्थिक सहाय्य याबाबत माहिती दिली. तसेच यावर्षी खरीप लागवड क्षेत्रात १६ हजार हेक्‍टरने वाढ झाल्याचेही सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com