वर्धा जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

वर्धा जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी
वर्धा जिल्ह्यात साडेपाच हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी

वर्धा  : यंदा एफसीआय शासकीय तूरखरेदी करणार आहे. चार मार्चपर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ६६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांना १५ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. बाजार समितीमध्ये नवीन तूर विक्रीला आली असून, प्रतिक्‍विंटल ५३०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.  शासकीय तूर नोंदणीचे काम ‘नाफेड’कडेच आहे. तांत्रिक अडचणी, साठवणुकीची व्यवस्था, माथाडी कामगार आदींमुळे शासकीय तूर खरेदीस विलंब होत होता. त्यामुळे यंदा एफसीआय तूरखरेदी करणार आहे. एफसीआय तूरखरेदी जरी करणार असली, तरी वेळेवर चुकारा मिळतो की नाही, याची शेतकऱ्यांना शंका आहे. अनेकदा ऑनलाइन नोंदणी केलेले शेतकरी शासनाला तूर विक्री करीत नाही, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ६६२ शेतकऱ्यांनी शासकीय तूर विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यंदा अतिपावसामुळे तुरीचे पीक जळले आहे; तर जानेवारी महिन्यात पडलेल्या धुयारीमुळे तुरीचा बार करपला. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली. कोरडवाहू जमिनीत एकरी एक क्‍विंटल; तर बागायती जमिनीत एकरी दोन ते तीन क्‍विंटलचा उतारा आहे. सध्या बाजार समितीमध्ये नवीन तुरीला प्रतिक्‍विंटल पाच हजार ३०० रुपये भाव मिळत आहे. पुढे शासकीय भावापेक्षा अधिक भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.  पणनने केली कापूस उत्पादकांची कोंडी यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली. भाव वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कापूस साठवून ठेवला; पण कापसाचे भाव सुधारले नाहीत. खुल्या बाजारात प्रतिक्‍विंटल ४७०० रुपयांनी कापसाची खरेदी सुरू आहे. पणन महासंघानेही काही अडचणींअभावी कापसाची खरेदी बंद केल्याने कापसाचे भाव आणखी पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.   

आत्तापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार ६६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. १५ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. त्यामुळे एक ते दोन हजार नोंदणी वाढण्याची अपेक्षा आहे.  - शेख दिलाल, जिल्हा मार्केटिंग अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com