Agriculture news in marathi; In Wardha district,34459 farmers cultivate crop insurance | Agrowon

वर्धा जिल्ह्यात ३४,४५९ शेतकऱ्यांनी काढला पीकविमा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

वर्धा  ः सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोसणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पिकाला विम्याचे कवच दिले आहे. नगदी पिकासाठी पाच टक्‍के तर तृणधान्य आणि कडधान्य पिकासाठी २ टक्‍के असे एकूण ६ कोटी ९५ लाख ७ हजार ४८१ रुपये संरक्षित रक्‍कम म्हणून भरले आहेत. 

वर्धा  ः सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोसणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पिकाला विम्याचे कवच दिले आहे. नगदी पिकासाठी पाच टक्‍के तर तृणधान्य आणि कडधान्य पिकासाठी २ टक्‍के असे एकूण ६ कोटी ९५ लाख ७ हजार ४८१ रुपये संरक्षित रक्‍कम म्हणून भरले आहेत. 

कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या खरिपात नुकसानीपोटी नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाख रुपयांची भरपाई विमा कंपीनकडून देण्यात आली होती. त्या वेळी इफ्को टोकीयो कंपनीविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. विमा योजना ही शेतकऱ्यांऐवजी कंपनी हिताची असल्याचेही आरोप झाले. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांचा विमा योजनेला प्रतिसाद मिळणार नाही किंवा तो कमी मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु, यावर्षीच्या खरिपात एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पिकाला विमा संरक्षण दिले आहे.

यावर्षी २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाचा एकूण ४२७.८३ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. १६२.९८ हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांच्या आत तर २६४.८५ हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६१४ शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातून आजवर सुमारे ८७ तक्रारी करण्यात आल्या असून यातील सर्वाधिक तक्रारी आर्वी तालुक्‍यातील आहेत. कापणीपूर्वी गटात ४६ तर कापणी पश्‍चात गटात ४१ शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...