agriculture news in Marathi, Warkari at return rout, Maharashtra | Agrowon

।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन झाले आता ।।
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी साधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर मुक्कामी असलेले वारकरी आषाढीचा भव्य सोहळा आपल्या मनात साठवत शनिवारी (ता. १३) परतीच्या वाटेवर निघाले. त्यामुळे एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनवर गावाकडे परतण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी झाली. अनेक वारकरी खासगी वाहनाने आले होते. त्यामुळे सर्व वाहने एकाच वेळी शहराच्या बाहेर पडत असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. 

पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि चंद्रभागेतील स्नानाची पर्वणी साधण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून पंढरपूर मुक्कामी असलेले वारकरी आषाढीचा भव्य सोहळा आपल्या मनात साठवत शनिवारी (ता. १३) परतीच्या वाटेवर निघाले. त्यामुळे एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनवर गावाकडे परतण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी झाली. अनेक वारकरी खासगी वाहनाने आले होते. त्यामुळे सर्व वाहने एकाच वेळी शहराच्या बाहेर पडत असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. 

यंदा दुष्काळाची परिस्थिती असूनही वारकऱ्यांची संख्या अधिक राहिली. सुमारे बारा लाखांहून अधिक वारकरी यंदा पंढरीत आले होते. शुक्रवारी आषाढी एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरीत भक्तीचा महापूर आला होता. आषाढी यात्रेची सांगता ही परंपरेनुसार आषाढी पौर्णिमेच्या गोपाळ काल्याने होते. पौर्णिमा मंगळवारी (ता. १६) आहे. त्यापूर्वी शेकडो वारकरी गोपाळकाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होणारा महाद्वार काला झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघतात. 

मात्र, अलीकडे द्वादशीपासूनच वारकरी परतीच्या प्रवासाला निघतात. त्यामुळे बहुसंख्य वारकऱ्यांनी परतीची वाट धरली. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच पंढरपूरमधून बाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर परतीसाठी वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. प्रबोधनकार ठाकरे चौकाकडून के.बी.पी. कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक बराच वेळ मंद गतीने सुरू होती. त्याशिवाय नवीन पूल, ६५ एकर परिसर, सांगोला रस्ता, कराड रस्ता, सातारा रस्ता, पुणे रस्ता या मार्गावर वाहतूक सुरळीत व्हायला वेळ जात होता. 

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...