Agriculture News in Marathi A warning of agitation from cashew, mango growers | Agrowon

काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

आंबा, काजू बागायतदारांना मिळालेली अत्यल्प नुकसानभरपाई आणि न मिळालेल्या विमा परतावा, या दोन विषयांवरून आंबा, काजू बागायतदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सिंधुदुर्गनगरी : आंबा, काजू बागायतदारांना मिळालेली अत्यल्प नुकसानभरपाई आणि न मिळालेल्या विमा परतावा, या दोन विषयांवरून आंबा, काजू बागायतदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गरज भासल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काजू, आंबा बागायतदारांनी सभेत दिला. 

वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आंबा, काजू बागायतदार शास्त्रज्ञ विचार मंचची बैठक जयप्रकाश चमणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला विलास ठाकूर, हनमुत आंगवेकर, दीपक नाईक, रत्नदीप धुरी, उत्तम वालावलकर, विवेक कुबल, प्रकाश डिचोलकर, गजानन वेंगुर्लेकर, ऐश्वर्य चमणकर आदी उपस्थित होते. 

तौक्ते चक्रवादळात नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्याची घोषणा शासनाने केली होती. दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा होती. परंतु प्रत्यक्षात हेक्टरी १८ हजार देण्याचा घाट कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी घातला आहे. तशा स्वरूपाचे पंचनामे करण्यात आले आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, आम्ही तो सहन करणार नाही, अशी भूमिका आंबा, काजू बागायतदारांनी घेतली आहे. या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी फळ संशोधन केंद्रात बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.

येत्या काही दिवसांत तौक्तेची अपेक्षित नुकसानभरपाई आणि आंबा, काजू विमा परतावा मिळाला नाही तर आंदोलनाची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल, असा इशारा बागायतदारांनी प्रशासनाला दिला आहे. या शिवाय शेतकरी वापरत असलेल्या कीटकनाशकांसाठी शासनाने ५० टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी देखील सभेत शेतकऱ्यांनी केली. 


इतर बातम्या
बंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
बांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...
पुणे जिल्ह्यात  पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...
यंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...
शेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...
सततच्या पावसामुळे  रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
  सांगली जिल्हा बँकेच्या  चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...
खरीप हंगाम काढणीवर  पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
खानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव  : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...
मराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...
जळगाव जिल्ह्यास पावसाने झोडपलेजळगाव  : जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) अनेक...
तडवळेत जोरदार पावसामुळे सोयाबीन...कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद : परिसरात गेल्या चार...
परभणी, हिंगोलीत पावसाने सोयाबीनला फुटले...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु...