कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा

वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावरून वाऱ्यांचे प्रवाह वाढणार आहेत. यामुळे आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Warning of heavy rains in Konkan, Central Maharashtra
Warning of heavy rains in Konkan, Central Maharashtra

पुणे : पूर्व भारतात असलेल्या वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे अरबी समुद्रावरून वाऱ्यांचे प्रवाह वाढणार आहेत. यामुळे आज (ता. २८) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुलाब चक्रीवादळाची तीव्रता ओसरली असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानच्या जैसलमेर पासून, उदयपूर, अकोला, चंद्रपूर ते वादळी प्रणालीपर्यंत (डीप डिप्रेशन) हा पट्टा सक्रिय आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर, तसेच अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरली असून, उत्तर कोकणापासून वादळी प्रणाली पर्यंत पूर्व आणि पश्चिम दिशेने वाऱ्यांचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

कोकण, उत्तर महाराष्ट्रात आज ‘रेड अलर्ट’ गुलाब चक्रीवादळाच्या प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. आज (ता. २८) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा, पश्चिम विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुसळधार वादळी पाऊस (रेड अलर्ट) : कोकण : पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्र : नाशिक, धुळे, जळगाव.

जोरदार वादळी पाऊस (ऑरेंज अलर्ट)  कोकण: मुंबई, सिंधुदुर्ग. मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, नगर, पुणे.

वादळी पाऊस (येलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर. मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर. विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वाशीम.

सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) मध्य महाराष्ट्र : नगर : जामखेड ५१, कोपरगाव ३०, पारनेर ४२, धुळे : धुळे ३६, जळगाव : अंमळनेर ३२, पुणे : शिरूर ५५.  मराठवाडा : हिंगोली : हिंगोली ४६, लातूर : जळकोट ३६, रेणापूर ४५, नांदेड : अर्धापूर ३५, लोहा ४२, परभणी : गंगाखेड ५०, मानवत ३२, पालम ४५, पाथरी ४०  विदर्भ : चंद्रपूर : जेवती ६८, कोर्पणा ४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com