Agriculture News in Marathi Warning of heavy rains in North Konkan, North Maharashtra | Agrowon

उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 डिसेंबर 2021

अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. १) उत्तर कोकणातील पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. १) उत्तर कोकणातील पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात गारठा वाढला असतानाच ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या पुढे गेला आहे. मंगळवारी (ता. ३०) गोंदिया येथे नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अलिबाग येथे उच्चांकी ३४.४ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. 

मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये)
पुणे २८.१ (१६.६), जळगाव २९.९ (१७), कोल्हापूर २६.५ (२०.७), महाबळेश्‍वर २१.८(१५.५), मालेगाव २८.२ (१४.३), नाशिक २७.६ (१६.२), निफाड २९.३ (१७.२), सांगली २७.४ (२१.४), सातारा २६.२ (२१.३), सोलापूर २९ (१८.१), सांताक्रूझ ३४ (२३.८), अलिबाग ३४.४ (-), डहाणू ३३.७ (२१.४), रत्नागिरी ३४.१ (२६), औरंगाबाद २८.२ (१८), नांदेड ३२.४ (१९.२), उस्मानाबाद - (१६.४), परभणी २७.६ (१८.९), अकोला ३१.४ (१८.६), अमरावती ३०.२ (१५), ब्रह्मपुरी ३२.१ (१५.२), बुलडाणा २८.५ (१६.५), चंद्रपूर २९.४ (१७.६), गडचिरोली २९ (१५), गोंदिया २८.८ (१०.९), नागपूर ३०.२ (१२.५), वर्धा २९.८ (१५), वाशीम ३१.५ (१५), यवतमाळ ३०.५ (१५). 
 

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत 
बंगालच्या उपसागरात दक्षिण थायलंड जवळ हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अंदमान समुद्राकडे सरकत आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकून भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे येताना तीव्र होऊन बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. ३) चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावांमुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात आज (ता.१) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात हिरवी मिरची १२०० ते ६५०० रुपयेपरभणीत ४००० ते ६५०० रुपये परभणी ः येथील पाथरी...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...