Agriculture News in Marathi Warning of heavy rains in sparse places in Vidarbha | Agrowon

विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 ऑक्टोबर 2021

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारादेखील हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १७) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारादेखील हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आंध्र प्रदेश किनाऱ्यालगत आहे. आज ही प्रणाली निवळण्याची शक्यता असली, तरी तिच्या प्रभावामुळे वाहणारे चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य भारतातून उत्तर प्रदेश राज्याकडे सरकणार आहे. या प्रणालीमुळे आंध्र प्रदेशचा किनारा छत्तीसगड, ओडिशा, विदर्भ आणि मध्य प्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. 

दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे आणि केरळच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाब क्षेत्र आज विरून जाणार आहे. या प्रणालीमुळे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्यांत जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) 
विदर्भ : अकोला, चंद्रपूर. 

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : 

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर. 

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर. 

विदर्भ : बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.  

 
 


इतर बातम्या
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...
उन्हाळी कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे...नाशिक : साठवलेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात २५ हजार कृषिपंपांची वीज...जळगाव ः  जिल्ह्यात वीजबिले भरल्याशिवाय...
सोयाबीन वायद्यांत सुधारणापुणे ः बाजारात सोयाबीनचे दर पडल्यानंतर केंद्रीय...
वऱ्हाडावर ढगांचे आच्छादन;  तूर, हरभरा...अकोला ः हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार...
यवतमाळ जिल्ह्यात शाळा  महावितरणच्या ‘...यवतमाळ : वीज महावितरण कंपनीची वाढती थकबाकी वसूल...
शेतकरी संघटनेने केली  चुकीच्या...बुलडाणा : थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने...
‘फॅसिझमविरोधात लढण्यास  सक्षम पर्याय...मुंबई : देशात सुरू असलेल्या फॅसिझमविरोधात लढण्यास...
आझाद मैदानावर बुधवारपासून  गट सचिवांचे...सांगली ः राज्यातील गट सचिवांचे सेवा व वेतनाचे...
विमा कंपनीच्या कार्यालयात  मुक्काम...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
पीडीसीसी’च्या निवडणुकीसाठी २९ अर्ज दाखल पुणे : राज्यात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा...
मालेगांव पाटबंधारे विभागात पाटपाणी व...नाशिक : रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये पिण्यासाठी व...
मराठवाड्यात ढगांची दाटी; भुरभुर औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात पुन्हा...
खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी...जळगाव ः खानदेशात लाल कांद्याचे दर नीचांकी स्थितीत...
सोलापूर ः ‘सिद्धेश्‍वर’चे गाळप चार...सोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर...