Agriculture news in marathi Warning of heavy rains in Vidarbha from tomorrow | Page 2 ||| Agrowon

विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे झळा तीव्र होत असून कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. दरम्यान विदर्भाच्या काही भागात पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे.

पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. त्यामुळे झळा तीव्र होत असून कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. दरम्यान विदर्भाच्या काही भागात पावसासाठी पोषक वातावरण बनत आहे. आज काही भागात अंशतः ढगाळ वातावरण होण्याचे संकेत आहेत. उद्यापासून (बुधवार) संपूर्ण विदर्भात वादळी पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

पूर्वमोसमी पाऊस पडून गेल्यानंतर राज्यात आकाश कोरडे झाले आहे. मात्र, आता सकाळपासून कडक ऊन पडत आहे. दुपारी कमाल तापमानाचा पारा कमालीचा वाढत आहे. त्यामुळे ४० अंशापर्यंत खाली आलेला पारा पुन्हा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. वाढत्या उन्हामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. सोमवारी (ता. १९) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रम्हपुरी येथे देशातील सर्वाधिक ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदविले गेले. तर पुणे, जळगाव, महाबळेश्वर, मालेगाव, सातारा, सोलापूर, नागपूर, वर्धा, अकोला या ठिकाणी कमाल तापमान सरासरीएवढे होते. महाबळेश्वर येथे सर्वात कमी १९.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. 

गेल्या तीन दिवसांपासून झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि तेलंगाना दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. झारखंड परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग व परिसर ते उत्तर कर्नाटक व मराठवाडा दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. 

तसेच पंजाब व परिसरातही चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तरेकडील पूर्व उत्तर प्रदेशाच्या परिसर, आसामचा मध्य भाग व परिसर आणि दक्षिणेकडील केरळ व परिसरातही चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे विदर्भातील काही भागात उन्हाचा चटका वाढला आहे.


इतर बातम्या
नाशिकमध्ये २३ मेपर्यंत  कडक लॉकडाऊननाशिक : जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या अंशत:...
भुईमुगाच्या अल्प उत्पादनाने ...श्रीरामपूर, जि. यवतमाळ : भुईमुगाचे बोगस बियाणे व...
नाचणी खरेदीचा प्रस्ताव पणन मंडळामार्फत...कोल्हापूर : नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधार...
कोरोनाच्या निर्बंधांमुळे पीककर्ज वाटपात...अकोला : आगामी खरीप हंगामासाठी आता अवघे काही दिवसच...
सिंधुदुर्गमध्ये आंबा काढणीला गती;...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यातील...
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
माढा, उत्तर सोलापूर, अक्कलकोटला पाऊससोलापूर ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) काही भागात...
उजनीचे पाणी पळविण्याचा प्रश्न...सोलापूर ः उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याला...
जळगाव जिल्ह्यातील पीक कर्जवाटपाला गती...जळगाव ः जिल्ह्यात खरिपासंबंधी पीक कर्जवाटप गेल्या...
वार्सा येथे पाणीटंचाईशी पंधरा...वार्सा, जि. धुळे : धज्या आंबापाडा येथील...
बीडमध्ये वादळी पावसाचा दुसऱ्या दिवशीही...बीड : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी पावसाचा...
नांदेड जिल्ह्यात पावसाचा तडाखा सुरुच नांदेड : जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाने मुक्काम...
‘लिंबोटी’चे पाणी २३ गावांना मिळणारनांदेड : कंधार तसेच लोहा तालुक्यातील संभाव्य...
साताऱ्यात आले लागवडपूर्व कामांना गतीसातारा ः जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या शुभ...
पुणे बाजार समितीमध्ये लसीकरणाला प्रारंभपुणे ः गुलटेकडी येथील पुणे बाजार समितीच्या वतीने...
केवळ जाहिरातींद्वारे कोरोना संपणार नाही...मुंबई ः कोरोना परिस्थिती लक्षात घेता ‘एक देश एक...