पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

``पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्णा नदी तसेच जवळील नाले, ओढे काठच्या गावांतील नागरिकांनी उपाययोजना करुन योग्य ती खबरदारी घ्यावी’’, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.
Warning to the villages along the Purna river
Warning to the villages along the Purna river

हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील येलदरी धरणात ९१.८४ टक्के, तर सिध्देश्वर धरणात ६६.१४ टक्के उपयुक्त पाणी आहे. उर्ध्वभागातील बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून नदी पात्रात विसर्ग सुरु केल्यास येलदरी आणि सिध्देश्वर धरणातून पाणी सोडावे लागेल. त्यामुळे पुर्णा नदीचे पात्र भरुन वाहू शकते. पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्णा नदी तसेच जवळील नाले, ओढे काठच्या गावांतील नागरिकांनी उपाययोजना करुन योग्य ती खबरदारी घ्यावी’’, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

नागरिकांनी गावात पुरस्थिती निर्माण झाल्यास घरातील उपयुक्त सामान, महत्वाची कागदपत्रे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी, विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. तत्काळ प्रशासनास कळवावे. गावात, घरात जंतूनाशक असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पुर स्थितीत उंच ठिकाणी जावे. सोबत रेडिओ, टॉर्च, सुके खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. शक्य असल्यास घरातील वाहने उंच ठिकाणी हलवावी. घर सोडून जाताना दारे, खिडक्या सर्व घट्ट बंद करून जावे. कुंटूंबातील सर्व व्यक्तींकडे ओळखपत्र राहील, याची काळजी घ्यावी. 

पुरामध्ये अडचणीत सापडला असाल, तर आजूबाजूच्या साधनांचा वापर करावा. (उदा. पाण्यावर तरंगणारे मोठे लाकूड, प्लास्टिकचे ड्रम याचा वापर करावा.) कोणी व्यक्ती वाहत जात असेल, तर त्यास दोरीच्या सहाय्याने वाचविण्याचा प्रयत्न करा, पुर स्थितीत घाबरून जाऊ नका, सरकारी सूचनांचे पालन करा, तात्काळ स्थानिक तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षास ०२४५६ २२२५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुर असलेल्या भागात, नदीच्या पुलावर विनाकारण भटकू नये. पुराच्या पाण्यात चुकुनही जावू नका. पूर आल्यानंतर पुलावरुन गाडी घालण्याचा, अथवा पूल ओलांडण्याचा प्रयत्न करून नका. दुषित, उघड्यावरील अन्न- पाणी टाळा, असे आवाहन जयवंशी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com