Agriculture news in marathi; Warud taluka also included in Chief Minister's Sustainable Agricultural Irrigation Scheme | Agrowon

वरुड तालुक्‍याचाही मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेत समावेश

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

अमरावती  ः शासनाने मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेत सूक्ष्म सिंचनासाठी ८० टक्‍के अनुदान जाहीर केले असून, त्यासाठी वरुड तालुक्‍यासह अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍याचा समावेश आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. 

अमरावती  ः शासनाने मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेत सूक्ष्म सिंचनासाठी ८० टक्‍के अनुदान जाहीर केले असून, त्यासाठी वरुड तालुक्‍यासह अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍याचा समावेश आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. 

ड्रायझोनमधील वरुड तालुक्‍याला ८० टक्‍के ठिबक अनुदानातून वगळल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला होता. या तालुक्‍याचा समावेश योजनेत व्हावा या करिता १ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारादेखील संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयारी यांनी प्रशासनाला दिला. त्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्‍यांचा ८० टक्‍के अनुदान योजनेत समावेश असल्याचा खुलासा पत्रकाव्दारे केला आहे. प्रसिद्धिपत्रकानुसार, कृषी विभागाने १९ ऑगस्टला या संबंधीचा निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयानुसार संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातील सर्व अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना ८० टक्‍के व इतर शेतकऱ्यांना (पाच हेक्‍टर मर्यादेत) ७५ टक्‍के अनुदानाचा लाभ देण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजना सूक्ष्म सिंचनाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, ठिबक सिंचनासाठी भरघोस अनुदान देण्यात येत आहे. त्याचा अधिकाधिक पात्र शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
नांदेडमध्ये हळद ४९०० ते ५७०० रूपये...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...