सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव रखडला की रखडवला?

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या दोन्ही तालुक्‍यासाठी मार्डी आणि मंद्रूप याठिकाणी स्वतंत्र उपबाजार समित्या निर्माण करण्याचा निर्णय बाजार समितीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी घेतला.
Was the proposal of the sub-market committees in Solapur delayed or delayed?
Was the proposal of the sub-market committees in Solapur delayed or delayed?

सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या दोन्ही तालुक्‍यासाठी मार्डी आणि मंद्रूप याठिकाणी स्वतंत्र उपबाजार समित्या निर्माण करण्याचा निर्णय बाजार समितीच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी घेतला. तसा, प्रस्तावही पणन विभागाकडे पाठवला. पण नंतरच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने हा निर्णय रखडला की रखडवला, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

सोलापूर ही राज्यातील महत्वाची बाजारपेठ आहे. पण, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक अशा तीन राज्याच्या सीमेवर असल्याने सोलापूरला महत्व आहे. सोलापूर ही विशेषतः कांदा, डाळिंब, बेदाणा यासाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवायही ज्वारी, गहू, मूग, उडीद या धान्याच्या खरेदीसाठी आघाडीवरील बाजार समिती आहे. सोलापूर बाजार समितीचे कार्यक्षेत्र उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या दोन तालुक्‍यापुरते मर्यादित असले, तरी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात फळे, भाज्या आणि धान्याची आवक-जावक बाजारात होते. बाजारातील वार्षिक उलाढाल सुमारे २०० कोटी रुपयाहूनही अधिक आहे. 

कांद्यासाठी बाजार समिती सर्वाधिक प्रसिद्ध आहे. बाजार समितीच्या आवारात या दोन्ही तालुक्‍यातील शेतकऱ्यांना  त्याच भागात उपबाजार सुरु करुन द्यावा, यासाठी तत्कालीन सभापती महादेव चाकोते आणि त्यानंतरचे सभापती दिलीप माने यांनी बाजार समितीचे मूळ कार्यक्षेत्र असलेल्या उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी मार्डी आणि मंद्रूप येथे स्वतंत्र उपबाजार सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

सभापतींही गप्पच

गतवर्षी भाजप-शिवसेना युती काळात सोलापूर बाजार समितीचे सचिव म्हणून शासनाकडून प्रतिनियुक्तीवर मोहन निंबाळकर यांच्याकडे पदभार होता. पण गेल्यावर्षी पुन्हा त्यांच्याकडील पदभार काढून प्रभारी सचिव म्हणून बाजार समितीतील उपसचिव उमेश दळवी यांच्याकडे पदभार देण्यात आला. विशेष म्हणजे सध्या भाजपचेच आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे सभापतीपदाचा पदभार आहे. ते ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात, त्यातील काही गावातील शेतकऱ्यांचा थेट बाजार समितीशी संबंध येतो. पण, तेही यावर काहीच भूमिका घेत नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com