वाशीम, बुलडाणा ‘अनलॉक’; अकोला ‘लॉक’च राहणार

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेले कडक निर्बंध अखेरीस कमी होत आहेत. सोमवारपासून (ता.१४) वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
वाशीम, बुलडाणा ‘अनलॉक’;  अकोला ‘लॉक’च राहणार Washim, Buldana ‘Unlocked’; Akola will remain 'locked'
वाशीम, बुलडाणा ‘अनलॉक’;  अकोला ‘लॉक’च राहणार Washim, Buldana ‘Unlocked’; Akola will remain 'locked'

अकोला : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेले कडक निर्बंध अखेरीस कमी होत आहेत. सोमवारपासून (ता.१४) वऱ्हाडातील बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोनासाठी लावलेले निर्बंध हटविले असून, सर्व प्रकारच्या आस्थापना, दुकाने नियमित सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अकोला मात्र, अद्याप तिसऱ्या श्रेणीत असल्याने निर्बंधांसह आस्थापना सुरू राहतील. वाशीम जिल्ह्याचा ‘पॉझिटिव्हीटी रेट’ २.२५ टक्क्यांपर्यंत असून, फक्त ९.०१ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्याचा समावेश राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार पहिल्या टप्प्यात झाला आहे. त्यामुळे ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले आहेत. सोमवारपासून (ता.१४) पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा व इतर सेवांची दुकाने नियमित सुरू राहतील. या दुकानांमधील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त ‘होम डिलिव्हरी’द्वारे वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी दुकानदारांनी नियोजन करावे. त्याकरिता दुकानदारांनी स्वतःचा व्हॉटस ॲप क्रमांक दर्शनी भागात प्रसिद्ध करावा. तसेच ग्राहकांचे व्हॉटस ॲप क्रमांक घेऊन त्यांना घरपोच वस्तू पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच दुकानांमध्ये ग्राहकांशी बोलताना सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून पारदर्शक काच, प्लास्टिक कव्हर किंवा इतर शिल्ड साहित्य ठेवावे. तसेच इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचा वापर करावा. दुकानासमोर ग्राहकांना योग्य सामाजिक अंतर राखून उभे राहण्यासाठी स्पष्ट दिसतील, असे वर्तुळ करण्यात यावे. दुकानासमोर पार्किंगच्या जागेत व ओट्यावर साहित्य ठेवण्यात येऊ नये. जेणेकरून या ठिकाणी ग्राहकांना उभे राहता येईल व गर्दी होणार नाही. रेस्टॉरंट नियमित सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पामध्ये गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्राहकांना टोकन पद्धतीने, मोबाइल एसएमएस., व्हॉटस ॲप संदेशाद्वारे सेवेबाबत माहिती द्यावी. सार्वजनिक जागा, खुली मैदाने, वॉकिंग, सायकलिंग नियमित सुरू राहील. सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ यांना सभागृह, हॉलच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने परवानगी राहील. हॉलमधील ज्या खुर्च्यांचा वापर करावयाचा नाही, त्या खुर्च्यांना सेलोटेप, रिबन व स्टीकर लावून त्या वापरात नाहीत, असे दर्शविणे बंधनकारक करण्यात आले आहे. लग्न समारंभ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत नियमित सुरू राहतील. या उपस्थितीच्या मर्यादेत मंगल कार्यालये, हॉल, लॉन तसेच घरी लग्न समारंभ आयोजित करता येतील.  अकोला जिल्ह्याला मात्र दिलासा मिळू शकलेला नाही. या जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर व ऑक्‍सिजनवरील रुग्ण यांचा दर अधिक असल्याने सध्या नवीन नियम लागू झालेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com