Agriculture news in marathi In Washim district 699 crore peak loan disbursement | Agrowon

वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटप

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 जुलै 2021

वाशीम जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत ६९९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांनी ८५ हजार १५७ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. 

वाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत ६९९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांनी ८५ हजार १५७ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. पात्र असलेल्या एकूण खातेदारांपैकी ८१ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण झाले.

जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ४७९१ शेतकऱ्यांसाठी १०२५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून ६०५ कोटींचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. ६२९१८ शेतकऱ्यांना हे पीककर्ज या बँकेला वाटप करायचे होते. या तुलनेत बँकेने सुमारे ५९३४६ शेतकऱ्यांना ४४९ कोटींचे वाटप केले. 

उद्दिष्टाच्या तुलनेत ९४ टक्के शेतकऱ्यांना तर रकमेच्या तुलनेत ७४ टक्के पीककर्जाची रक्कम वाटप केली 
आहे. सार्वजनिक, खासगी, व्यावसायिक बँका व विदर्भ कोकण ग्रामीण बँक मिळून ४१ हजार ८७३ खातेदार शेतकऱ्यांचे उद्दिष्ट दिले होते. तुलनेत या बँकांनी २५८११ शेतकऱ्यांना २४९ कोटींचे वाटप केले. या बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत ६१.६४ टक्के खातेदारांना पीककर्जाचा लाभ पोचविला. सर्व बँका मिळून ८५ हजार खातेदारांना आतापर्यंत पीककर्ज मिळाले आहे. 

अद्याप १९ हजारांपेक्षा अधिक शेतकरी पीककर्जापासून दूर आहेत. तर निर्धारित केलेल्या १०२५ कोटींपैकी ६९९ कोटींचेच वाटप झाले आहे. सध्या पीककर्ज वाटपाचे काम अंतिम टप्यात आहे. खरीप तसेच रब्बी हंगामासाठी एकूण ११०० कोटी रुपयांचा लक्षांक आहे.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...
उत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...
द्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...
राज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...
कोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....
द्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशा विश्रांतीनंतर राज्यात पावसाला...
द्राक्ष बागायतदार संघाचे आजपासून ६१ वे...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे...
मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची...पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी...पुणे ः ‘‘बदलत्या परिस्थितीत सामाजिक आणि मानसिक...
द्राक्ष पिकातील कलम वर्षभर यशस्वी...महाराष्ट्रात द्राक्ष, आंबा व अन्य फळपिकांचे कलम...