वाशीम खरेदी-विक्री संघाने सव्वा कोटीचा अपहार केला; तक्रार दाखल

वाशीम खरेदी-विक्री संघाने सव्वा कोटीचा अपहार केला; तक्रार दाखल
वाशीम खरेदी-विक्री संघाने सव्वा कोटीचा अपहार केला; तक्रार दाखल

वाशीम : येथील तालुका खरेदी-विक्री संघाने किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत खरेदी केलेल्या एक कोटी ३८ लाख २५ हजार किमतीच्या तूर आणि हरभरा खरेदीत अपहार केल्याचा अारोप असलेली फिर्याद सहायक निबंधकांनी पोलिसात दिल्याने वाशीम येथे गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षांसह व्यवस्थापक व सर्व संचालकांचा समावेश अाहे. याबाबत सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्रीकांत खाडे यांनी तक्रार दिली असून त्यात म्हटले की, खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाने संगनमत करून किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ४८८ क्विंटल तूर (किंमत २६ लाख ५९ हजार ६०० रुपये) आणि हरभरा २५०९.२१ क्विंटल हरभरा (किंमत १ कोटी ११ लाख ६५ हजार ९८४ रुपये) अशा एकंदरित १ कोटी ३८ लाख २५ हजार ९८४ रुपये रकमेचा अपहार केला. या प्रकारामुळे शासनासह शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते.  या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वाशीम तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष वामनराव महाले, उपाध्यक्ष कुंडलिक मोहळे, व्यवस्थापक नारायण कडवे, संचालक केशवराव इंगोले, संतोष गंगावणे, रामदास सोळंके, लक्ष्मणराव इंगोले, कुसुमताई गोरे, केशराबाई आखंड, रामचंद्र राठोड, विनोद पट्टेबहादूर, गजानन ठाकरे, गजानन गोटे, पांडुरंग पांढरे, सुरेश राठोड, रुपेश वऱ्हाडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले अाहेत.  

वर्षभरापासून पाठपुरावा या प्रकरणी खरेदी-विक्री संघाच्या काही संचालकांनी जिल्हा उपनिबंंधकाकडे सातत्याने पाठपुरावा करीत लक्ष देण्याची मागणी केली होती. तूर, हरभरा खरेदी घोळ असल्याची शंका उपस्थित केली जात होती. मात्र वेळेवर लक्ष न दिल्याने हा प्रकार सुरू होता. अाता प्रशासनाच्या तक्रारीवरून सर्वांनाच यामध्ये दोषी ठरविले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com