वाशीमची खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ५४ पैसे

वाशीम ः जिल्ह्याच्या २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ५४ पैसे इतकी निघाली आहे. यामध्ये २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली.
Washim kharif crops Revised interest rate 54 paise
Washim kharif crops Revised interest rate 54 paise

वाशीम ः जिल्ह्याच्या २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याची सुधारित सरासरी पैसेवारी ५४ पैसे इतकी निघाली आहे.  यामध्ये २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली.

वाशीम जिल्ह्यात एकूण ७९३ महसुली गावे आहेत. त्यापैकी ५७१ गावांची खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आली. तर २२२ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. वाशीम तालुक्यात लागवडी योग्य असलेल्या गावांची संख्या १३१ आहे. या सर्व गावांची सुधारित पैसेवारी ५७ पैसे आहे.

मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित पैसेवारी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची पैसेवारी ४७ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ५७ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची पैसेवारी ५९ पैसे आणि मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ५९ पैसे इतकी आहे. 

मालेगाव आणि रिसोड तालुक्याची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आढळून आली आहे. जिल्ह्यात मालेगाव, रिसोड तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांकडून ओल्या दुष्काळाची सुद्धा मागणी केली जात होती. अखेर या दोन तालुक्यांची पैसेवारी कमी आली आहे. आता अंतिम पैसेवारीकडे लक्ष दिले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com