वाशीम जिल्हा परिषदेवर  राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

येथील जिल्हा परिषदेमध्ये चंद्रकांत ठाकरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. नऊ महिन्यांपूर्वी ते या पदावरून पायउतार झाले होते.
On Washim Zilla Parishad The flag of the Nationalist Congress
On Washim Zilla Parishad The flag of the Nationalist Congress

वाशीम : येथील जिल्हा परिषदेमध्ये चंद्रकांत ठाकरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. नऊ महिन्यांपूर्वी ते या पदावरून पायउतार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस व शिवसेनेला सोबत घेऊन वाशीम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा रोवला आहे.  गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर ३१ संख्याबळ झालेल्या महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता स्थापन होणे निश्‍चित होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव निघाल्यामुळे मिनी मंत्रालयात सत्ता स्थापनेच्या दिशेने एक आठवड्यापासून राजकीय हालचाली सुरू होत्या. वाशीम जिल्हा परिषदेच्या ५२ आणि सहा पंचायत समितीमधील १०४ जागासाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकून जिल्हा परिषदेत आपला दबदबा कायम ठेवला. त्या खालोखाल काँग्रेसने ९, शिवसेना ६, भाजप ७, वंचित ८, अपक्ष ३, जन विकास आघाडी ६ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका जागेवर विजय प्राप्त केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग त्या वेळी वाशीम जिल्हा परिषदेत सुद्धा बघायला मिळाला. फार्म्यूल्याच्या आधारे त्या वेळी अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्‍याम गाभणे यांची वर्णी लागली होती. महाविकास आघाडीच्या या टीमने सुमारे चौदा महिने जिल्हा परिषदेची सत्ता उपभोगली. दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने खारीज झालेल्या जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील १४ आणि पंचायत समितीमधील २७ जागांसाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये निवडणूक पार पडली. त्यानंतर जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११, शिवसेना ६, भाजप ७, वंचित ६, जन विकास आघाडी ५, अपक्ष २ आणि स्वाभिमानी एक असे पक्षीय बलाबल झाले आहे. अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (ता. १९) निवडणूक प्रक्रिया  राबवण्यात आली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत ठाकरे यांचा एकमेव अर्ज आला. निर्धारित वेळेनंतर पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी ठाकरे बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. या वेळी जिल्हा परिषद सभागृहासमोर ठाकरे समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून आनंद साजरा केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com