वाशीम जिल्हा परिषद आरक्षण जाहीर
वाशीम जिल्हा परिषद आरक्षण जाहीर

वाशीम जिल्हा परिषद आरक्षण जाहीर

वाशीम : आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेली जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया अखेर सुरू झाली. नुकत्याच काढलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांचे मतदारसंघ राखीव झाले आहेत. आता त्यांना इतरत्र मतदारसंघ शोधण्याशिवाय पर्याय उरला नसल्याची स्थिती आहे.

वाशीम जिल्हा परिषदेची मुदत पाच महिन्यांपूर्वी संपली. त्या वेळी आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी आरक्षणाबाबत आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने झालेली आरक्षण सोडत रद्द केली होती. त्यानंतर आता न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून येथील नियोजन भवनात निवडणूक विभागाने जिल्हा परिषदेच्या ५२ गटांतील मागास व इतर प्रवर्गाचे आरक्षण जाहीर केले. 

अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी मेडशी, चिंचाबाभर, कळंबा महाली, केनवड, उंबर्डाबाजार, शेलू खुर्द व अनुसूचित जमाती महिलासाठी कासोळा, आसोला खुर्द, ब्राह्मणवाडा, हराळ व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी कंझरा, पांगरी नवघरे, गोभणी, तळप, फुलउमरी, भरजहागीर, पार्डी टकमोर, तर सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी मनभा, इंझोरी, शेंदूरजना, पोहरादेवी, पारवा, कवठळ, तिवळी, गोवर्धन, रिठद, वाकद व वारा जहागीर या गटांचा समावेश आहे. 

कामरगाव, पोहा, धामणी खडी, गिरोली, राजुरा, किन्हीराजा, डोंगरकिन्ही, शिरपूर, तामसी, अडोळी, तोंडगाव, अनसिंग हे गट खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहेत. भामदेवी, आसेगाव, कवठा, काटा, कुपटा, दाभा व उकळी पेन हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आहेत. तर कारंजा तालुक्यातील धनज बु., वाशीम तालुक्यातील वारला, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, कारंजा तालुक्यातील काजळेश्‍वर, मंगरुळपीर तालुक्यातील तर्हाळा हे गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत.

हरकतीची मुदत सोमवारपर्यंत

पंचायत समिती निर्वाचन गणांसाठी २७ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत व आता गटांसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीबाबतची प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना गुरुवारी (ता. २) जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालय, संबंधित पंचायत समिती कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. या अधिसूचनेवर सोमवार (ता. ६) पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती व सूचना सादर करता येतील. प्राप्त हरकती व सूचनांवर सोमवार (ता. ६) ते शुक्रवार (ता. १०) या कालावधीत अमरावती विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com