Agriculture news in Marathi Washim Zilla Parishad will distribute milch animals | Agrowon

वाशीम जिल्हा परिषद करणार दुधाळ जनावरांचे वाटप

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

वाशीम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांकडून १ ते ३१ जुलैपर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत.

वाशीम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून अनुदानावर दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांकडून १ ते ३१ जुलैपर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत.

अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना विशेष घटक योजना अंतर्गत तसेच आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना २ दुधाळ जनावरांचा ७५ टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात येणार आहे. लाभार्थी निवड झाल्यानंतर एका महिन्यात संबंधित लाभार्थ्याला २१ हजार २६५ रुपये लाभार्थी हिस्सा चलनाद्वारे भरावा लागणार आहे. या योजनेत अनुदान प्राप्त झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना प्रथम १ व सहा महिन्यानंतर दुसरे दुधाळ जनावर राज्याबाहेरील किंवा जिल्ह्याबाहेरील गुरांच्या बाजारातून खरेदी करून देण्यात येईल.

अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेतून तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थ्यांना आदिवासी उपयोजनेअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर १० शेळी व एक बोकड अशा गटाचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यास एका महिन्याच्या आत उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीसाठी १७ हजार ८१० व स्थानिक जातीसाठी ११ हजार ९६२ रुपये लाभार्थी हिस्सा चलनाद्वारे भरावा लागेल. सर्वसाधारण योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर तलंगा गट वाटप योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ हजार किमतीच्या २५ मादी व ३ नरचा समावेश असलेला तलंगा गट पुरविण्यात येणार आहे.

सर्व योजनांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागात उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील गरजू व पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी पशुसंवर्धन सभापती डॉ. श्याम गाभणे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. व्ही. एन. वानखडे यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...