agriculture news in marathi Of water from ‘Kurnoor’ Skipped the second cycle | Page 3 ||| Agrowon

‘कुरनूर’मधून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 एप्रिल 2021

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून गुरुवारी (ता.२२) दुसऱ्या आवर्तनापोटी नदीपात्रात ८०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.

सोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून गुरुवारी (ता.२२) दुसऱ्या आवर्तनापोटी नदीपात्रात ८०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. चार दरवाजातून हे पाणी सोडले आहे. या पाण्यामुळे अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी शहरांसह नदीकाठच्या २८ गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून या पाण्याची मागणी होत होती. काही दिवसांपूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार गुरुवारी (ता.२२) हे पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात ५३ टक्के पाणीसाठा आहे. तर ४३५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. 

सोडलेले पाणी खालच्या अक्कलकोट, सांगवी, ममदाबाद, निमगाव, सातनदुधनी, रूद्देवाडी, बबलाद, सिंदखेड या बंधाऱ्यांत साठवले जाणार आहे. प्रत्येक बंधाऱ्यात अडीच मीटर उंचीपर्यंत पाणी साठविण्यात येणार आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठी असेल. या आधीही एक आवर्तन धरणातून सोडण्यात आले होते. हे दुसरे आवर्तन असल्याचेही पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. 

गरजेवेळी पाणी

गेल्या काही दिवसांपासून या भागात पाण्याची टंचाई सुरू झाली होती. सुदैवाने गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. पण आता पाणी असूनही वेळेत मिळते की नाही, याबाबत प्रश्न होता. पण पाटबंधारे विभागाने या गावच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करून पाणी सोडले. ऐन गरजेवेळी पाणी सोडल्याने या गावांना दिलासा मिळाला आहे.


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...