कागलमधील पाच तलावांत २५ टक्केच साठा

कागलमधील पाच तलावांत २५ टक्केच साठा
कागलमधील पाच तलावांत २५ टक्केच साठा

म्हाकवे, जि. कोल्हापूर : कागल तालुक्‍यातील सहा लघू पाटबंधारे तलावांची पाण्याची साठवण क्षमता २९९.५३ दशलक्ष घनफूट इतकी आहे. केवळ शेंडूर तलावात ७२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उरलेल्या पाच लघू पाटबंधारे तलावात सद्यःस्थितीला १८ ते २८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत चाललेला पारा, दोन महिने कडक उन्हाळा याचा विचार करता तलावातील उपलब्ध पाणीसाठा ३०१० एकर शेतीला अपुरा ठरणार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. 

कागल तालुक्‍यात करंजीवणे, बेनिक्रे, सोनाळी, हणबरवाडी, शेंडूर व पिंपळगाव येथे घुपाटबंधारे तलाव आहेत. यामध्ये करंजीवणे तलावाची उंची २१ मीटर असून, साठवण क्षमता ५३.५७ दशलक्ष घनफूट इतकी आहे. तर या तलावाच्या पाण्याखाली २२७ हेक्‍टर शेतीक्षेत्र ओलिताखाली येते. सध्या तलावात १६ दशलक्ष घनफूट, म्हणजे २८ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 

सोनाळी लघुपाटबंधाऱ्याची उंची १२.४३ मीटर आहे. साठवण क्षमता ३८.२९ दशलक्ष घनफूट आहे. या तलावाच्या पाण्यावर १५४ हेक्‍टर शेती लाभ क्षेत्रात येते. सध्या या तलावात ९.९० दशलक्ष घनफूट इतका म्हणजे २५ टक्के पाणीसाठा आहे. हणबरवाडी तलाव २३.३६ मीटर उंचीचा आहे. तलावाचे लाभक्षेत्र ३६७ हेक्‍टर आहे. सध्या या तलावात १९.०६ दलघनफूट इतका म्हणजे २० टक्के पाणीसाठा आहे. 

शेंडूर लघू पाटबंधाऱ्याची साठवण क्षमता २४ दलघफू इतकी असून, तलावाची उंची १२.६७ मीटर आहे. १३० हेक्‍टर क्षेत्र (३२५ एकर) ओलिताखाली येते. सध्या या तलावात १६.१० दलघफू पाणीसाठा म्हणजेच ७२ टक्के आहे. पिंपळगाव (व्हन्नूर) तलावाची उंची ११.६१ मीटर असून, २३.०४ दशलक्ष घनफूट इतकी साठवण क्षमता आहे. या तलावाचे ४० हेक्‍टर लाभक्षेत्र आहे. सध्या ४.८० दशलक्ष घनफूट इतका म्हणजे १८ टक्के साठा आहे.

बेनिक्रे तलावात २४ टक्के पाणीसाठा बेनिक्रे तलावाची उंची २०.९९ मीटर असून, साठवण क्षमता ६४.३४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. या तलावाच्या पाण्याखाली २८६ हेक्‍टर शेती ओलिताखाली येते. सद्यःस्थितीत साठा १५.५० दशलक्ष घनफूट म्हणजे २४ टक्के आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com