agriculture news in marathi, water arrival decrease in dam, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक घटली 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नगर  ः जिल्ह्यात अजूनही पाऊस झालेला नाही. मात्र अकोले तालुक्यातील पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसावर धरणे भरली आहेत. दोन दिवसांपासून अकोले भागातही पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक कमी झाल्याने मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. 

नगर  ः जिल्ह्यात अजूनही पाऊस झालेला नाही. मात्र अकोले तालुक्यातील पश्चिम भागात सुरू असलेल्या पावसावर धरणे भरली आहेत. दोन दिवसांपासून अकोले भागातही पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक कमी झाल्याने मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. 

अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळता अन्य भागांत मात्र अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी हतबल आहेत. मात्र नाशिकमधील पावसामुळे कोपरगाव, नेवासे, श्रीरामपूर तालुक्यात प्रवरा नदीमुळे राहाता तालुक्यात, मुळा नदीमुळे राहुरी तालुक्यात, कुकडीमुळे पारनेर; तर भीमा नदीमुळे श्रीगोंदा, कर्जत तालुक्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेष असे की जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा काही भाग वगळला तर अन्य कोणत्याही भागात पाऊस नसतानाही जिल्हा पुराची परिस्थिती अनुभवत होता.

अकोल्यातील पावसावरच भंडारदरा, निळवंडे, मुळा प्रकल्प भरले असून दक्षिणेला मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा असलेल्या २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा प्रकल्पात सध्या ९६.९७, भंडारदरा धरणात ९५.१८; तर निळवंडे धरणात ८७.१३ टक्के पाणीसाठा आहे. मुळा धरणात ६५९२ क्युसेकने आवक सुरू आहे. चार दिवसांपूर्वी धरणातून पाच हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. आवक कमी झाल्याने हा विसर्ग चार हजारांवर आणला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीत २२३८, निळवंडे धरणातून २३१४; तर ओझर बंधाऱ्यातून ११ हजार २८५ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू होता.

दोन दिवसांपूर्वी हा विसर्ग पंचवीस हजारांच्या जवळपास होता. पाऊस कमी झाल्याने धरणात आवक कमी झाली, तसा विसर्गही कमी केला आहे. गोदावरी नदीत नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून होणारा विसर्ग कमी केल्याने कोपरगाव, नेवासा, राहाता, श्रीरामपूर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला. जिल्ह्याच्या अन्य भागांत तर पाऊस नाहीच, त्यामुळे शेतकरी मात्र तहबल आहेत. सोमवारी सकाळी सहापर्यंत झालेला पाऊस मिमी ः घाटघर ः ५८, रतनवाडी ः ७५, पांजरे ः ४८, वाकी ः ५२, भंडारदरा ः ५५, निळवंडे ः १८, अकोले १४. 

इतर ताज्या घडामोडी
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
अकोल्यात कृषी सहायकांचे पदोन्नतीच्या...अकोला  ः अमरावती विभागातील कृषी सहायकांच्या...
सांगलीच्या पूर्व भागातील अग्रणी कोरडीठाकसांगली  ः  सांगली जिल्ह्याच्या चार...
सातारा जिल्ह्यातील ‘मराठवाडी’च्या...ढेबेवाडी, जि. सातारा : गेल्या काही...
नगर जिल्ह्यात चार महसूल मंडळांत पावसाची...नगर : जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाने...
हलक्या सरींना सुकलेल्या पिकांना...उस्मानाबाद/ लातूर  : मराठवाड्यातील औरंगाबाद...
‘पोकरा’तील शेतकऱ्यांनाही मिळणार सूक्ष्म...अकोला  ः राज्यात दुष्काळाच्या झळा सहन...
राज ठाकरे यांची दिवसभर चौकशीमुंबई ः कोहिनूर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत...
मागासवर्गीय शेतकऱ्यांना विहिरींसाठी ३७४...पुणे  : राज्यातील मागास गटातील शेतकऱ्यांना...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...