बुलडाणा जिल्ह्यात उद्यापासून जलजागृती सप्ताह

बुलडाणा जिल्ह्यात उद्यापासून जलजागृती सप्ताह
बुलडाणा जिल्ह्यात उद्यापासून जलजागृती सप्ताह

बुलडाणा  ः जिल्ह्यात सोमवार (ता. १६)पासून रविवार (ता. २२) पर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहादरम्यान मोठ्या प्रमाणावर जल जागृती, जलसाक्षरता करणारे कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये कार्यशाळा, व्याख्यान, जलदिंडी, वक्तृत्व, रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धांचा समावेश आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्साहाने भाग घेऊन प्रयत्न करावेत, असे आवाहन अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले आहे. सप्ताहाचे उद्‍घाटन सोमवारी सकाळी ११ वाजता बुलडाणा पाटबंधारे विभाग कार्यालय परिसरात  जिल्ह्यातील विविध नद्यांमधील पाण्याचे कलशपूजन करून व जलप्रतिज्ञेने करण्यात येणार आहे. या वेळी जलप्रतिज्ञेचे सामूहिक वाचन करण्यात येईल. सप्ताहात १७ ते २१ मार्चदरम्यान प्रकल्पाचे लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात एक कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. चर्चासत्रात गावाचे लाभक्षेत्र पाणी उपलब्धता, सिंचनाच्या पद्धती, पिकांना लागणारे पाणी बचत आदी विषयांवर आधारित माहिती देण्यात येईल. तसेच सिंचनाचे कायदे, नियम, पाणी वापर संस्थांची संपूर्ण माहिती, होणारे फायदे, तालुक्यातील सिंचनाचे प्रश्‍न, अपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाचे नियोजन, उपसा सिंचन परवाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.  वॉटर रन, चित्रकला व वर्क्तृत्व स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थानी येणाऱ्या स्पर्धकांना रोख रकमेचे बक्षीस देण्यात येईल. नागरिकांनी स्पर्धा व इतर सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता सु. व. चौधरी यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com