agriculture news in marathi, Water bubbles from the ground in Peth taluka, nashik, maharashtra | Agrowon

पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत पाण्याचे बुडबुडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जुलै 2019

दहा वर्षांपूर्वी या भागात भूकंप झाल्याने आजही परिसरात भीतीचे वातावरण आहे. चालू वर्षी उन्हाळ्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी लहान छेद गेले आहेत, त्या ठिकाणी खडकावर बुडबुडे येत आहेत. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क आहेत. प्रशासनाने वेळेत कार्यवाही करावी. नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी.
- नरहरी झिरवाळ, आमदार, दिंडोरी - पेठ


 

नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन दिवसांपासून जमीन व खडकांतून कोणतातरी वायुसदृश घटक बाहेर येत असल्याने पाण्यावर बुडबुडे येताना स्पष्टपणे दिसत असल्याने एकीकडे कुतूहल, तर दुसरीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूगर्भात काहीतरी हालचाली सुरू असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येते. त्यामुळे जमिनीतून निघणारे पाण्याचे बुडबुडे नेमके काय आहेत, हा प्रश्न उभा राहिला आहे. 

निरगुडे गावाच्या उत्तरेला तलाव परिसरातील खडकातून पाण्याचे बुडबुडे बाहेर येत असून, त्यांचा आवाजही होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे, हे तपासणीअंती समोर येईल. याबाबत आमदार नरहरी झिरवाळ, तहसीलदार हरीश भामरे यांनी निरगुडे येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात मेरी येथील भूगर्भअभ्यासक विभागाला कळविण्यात आले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तालुक्यातील गोंदे, भायगाव, निरगुडे परिसरांत यापूर्वी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. तसेच या गावापासून जवळ असलेल्या आमदा डोहाला १० वर्षांपूर्वी भूकंपाचा धक्का बसल्याने एक ते दीड फूट रुंद तडे गेल्याने पाण्याचा प्रवाह थांबला होता. मागील वर्षांपासून या ठिकाणी पाणी साचलेले आहे. त्यामुळे गावातील स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

ऐन पावसाळ्यात खडकाळ भागातून पाण्याचे बुडबुडे निघत असून, त्यामधून गॅससारखा घटक बाहेर पडत आहे. त्यामुळे नागरिक घाबरलेले असून, प्रशासनाने भूगर्भशास्त्र विभागाकडून हा नेमका काय प्रकार आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी निरगुडे (ता. पेठ) येथील रहिवासी मंगेश खंबाईत यांनी केली.

या प्रकारासंदर्भात ‘मेरी’च्या संबंधित विभागाला कळविले असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, असे आवाहन पेठचे तहसीलदार हरिश भामरे यांनी केले.

प्राथमिक पाहणीत जास्त खोलवर परिणाम दिसत नाहीत. दीर्घ कालावधीनंतरचा पाऊस,पुनर्भरण प्रक्रिया, एप्रिल महिन्यातील भूकंपाचे धक्के कारण असू शकतात. यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे, असे भूजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक जीवन बेडवाल यांनी सांगितले.                                                                         

इतर बातम्या
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...