पुणे जिल्ह्यात ४३ टॅंकरने पाणीपुरवठा 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस कोसळत असल्याने धरणे ओसंडून वाहून लागली आहेत. नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे कोरडवाहू भागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदरसह आंबेगाव तालुक्यामधील काही ठिकाणी पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आहे. या पाच तालुक्यांतील ३८ गावे आणि २६७ वाड्यांमध्ये पाण्याची टंचाई भासत असल्याने ४३ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.  

उन्हाळ्यात जिल्ह्यातील मावळ वगळता सर्व तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा केला जात होता. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे भरली. पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागला. त्यामुळे नद्यांना अभूतपूर्व पूर आले. पुण्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्याने उजनीत १०० टक्के पाणीसाठा झाला. मात्र जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांतील काही गावांमध्ये अद्यापही पिण्यायोग्य पाणी उपलब्ध झालेले नाही. 

शुक्रवारपर्यंत (ता. ८) तालुकानिहाय पाणीटंचाई स्थिती 
तालुका गावे वाड्या टॅंकर
आंबेगाव  १ 
बारामती  ११ ११५ १२
दौंड ७  ५०
इंदापूर १२   ५८ १४
पुरंदर ४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com