राज्यात ६४४३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

 मुंबई : राज्यात ३ जून अखेर एकूण ६४४३ टँकर्सद्वारे ५१२७ गावे आणि १० हजार ८६७ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

या वेळी लोणीकर म्हणाले, की २०१८ ची लोकसंख्या व पशुधनाची संख्या विचारात घेऊन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकर मंजुरीचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांना व चारा छावणी मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून मागणी होताच ताबडतोब टँकर व चारा छावणी मंजूर करण्यात येते. राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दीर्घ व अल्प स्वरूपाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण व समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. 

पाणीपुरवठा करण्यासाठी राज्यात ९३१४ विहीर, विंधन विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. खासगी विहीर अधिग्रहणाचे दर वाढविण्यात आले आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींच्या मोबदल्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत. त्यानुसार अधिग्रहित पाण्याच्या स्रोतामधून टँकर भरण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्यासाठी १२ रुपये प्रतिहजार लिटर असा ठरविण्यात आला आहे. विहीर, तलाव उद्भवावरून टँकर भरण्यासाठी डिझेल जनरेटरच्या भाडेपट्टीचा तसेच डिझेलचा खर्च टंचाई निधीतून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टंचाईअंतर्गत उपाययोजनांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास निविदेचा कालावधी कमी करण्यात आला आहे.

टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी अन्य गावांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतून पिण्याच्या पाण्याचे टँकर्स भरले जातात, अशा प्रकरणी वाढीव वीज देयक टंचाई निधीमधून देण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले. टँकर्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार वाहनाच्या एक मेट्रिक टनासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागासाठी प्रतिदिन भाडे ३३८ रुपये प्रती ४.३० किलोमीटर प्रमाणे तसेच सर्वसाधारण भागासाठी प्रतिदिन २७० रुपये प्रती ३.४० किलोमीटर असे करण्यात आल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com