संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर जिल्ह्यात टॅंकरचा आकडा सातशेवर

नगर  : सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्हाभरात दुष्काळाची दाहकता जाणवण्यास प्रारंभ झाला आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवण्यास सुरवात झाली असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच टँकरची संख्या ७०० वर गेली आहे. आजमितीस ४७३ गावे व २६०६ वाड्या- वस्त्यांवरील १० लाख ७७ हजार १७२ नागरिकांची तहान ७०० टँकरच्या आधारे भागविली जात आहे.

यंदा जिल्ह्यात पावसाने हात आखडता घेतल्याने वार्षिक सरासरीही गाठली नाही. निळवंडे, भंडारदरा वगळता मुळा धरणही पूर्ण क्षमतेने भरले नाही. जलसंधारण कामे होऊनही पाऊसच नसल्याने त्यात पाणी साठले नसल्याने भूजल पातळी खालावली. त्यामुळे उपलब्ध असणारे जलस्रोत उन्हाळ्यापूर्वीच आटल्याने भर हिवाळ्यातच काही भागांत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा टँकरने पुरवठा सुरू करण्यात आला होता. आता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच टँकरने सातशेचा आकडा गाठला  आहे.  

गेल्या दोन वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने टँकरची फारशी गरज भासली नाही. मात्र यंदा सरासरीच्या अवघा ६९ टक्के पाऊस झाल्याने टँकरची संख्या उच्चांकावर जाऊन प्रथमच हजाराचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. पाथर्डी तालुक्याला सगळ्यात जास्त पाणीटंचाईची झळ बसली असून, तेथे १०६ गावे व ५८८ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख२४ हजार १७६ नागरिकांना १३० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अद्याप श्रीरामपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नसून, जिल्हा प्रशासनाकडे टँकर सुरू करण्यासाठी १ प्रस्ताव दाखल झाला असल्याचे समजते.

तालुकानिहाय टँकर ः संगमनेर - ४६, अकोले - ३,  कोपरगाव - ६, राहुरी - १, नेवासा - ३२, राहाता - ४, नगर - ५६, पारनेर - १३६, पाथर्डी - १३९, शेवगाव - ५५, कर्जत - ९०, जामखेड - ८६, श्रीगोंदा - ४६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com