नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ८७३ वर गेलेली टॅंकरची संख्या ४०५ वर आली आहे. सध्या ३५० गावे, दोन हजार ९५ वाड्या-वस्त्या, सात लाख ४९ हजार ७२२ नागरिकांना ४०५ टॅंकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट होते. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगामही वाया गेला. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा, यासाठी प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जूनअखेर ६०३ गावे, तीन हजार ४०० वाड्या-वस्त्यांवरील साडेचौदा लाख नागरिकांना विक्रमी ८७३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. 

सध्या राहाता, नेवासे, संगमनेर, राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या अकरा तालुक्‍यांतील गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त ९५ टॅंकर जामखेड तालुक्‍यात सुरू आहेत, तर सर्वांत कमी एक टॅंकर राहुरी तालुक्‍यात सुरू आहे. पावसाच्या सुरवातीला रोहिणी नक्षत्र कोरडेच गेले. त्यानंतर मात्र सर्व नक्षत्रांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ज्या ठिकाणी पावसामुळे पाणी उपलब्ध होत आहे, त्या ठिकाणचे टॅंकर बंद होत  आहेत. 

टॅंकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर होते; परंतु निर्माण झालेली टंचाई स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारकडून टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.   तालुकानिहाय टॅंकर : संगमनेर-२०, राहुरी- १, नेवासे- ६, राहाता- ५, नगर-३४, पारनेर-५९, पाथर्डी-७५, शेवगाव-३६, कर्जत- ४७, जामखेड-९५, श्रीगोंदे-२७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com