agriculture news in marathi, water circulation through tankers status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ८७३ वर गेलेली टॅंकरची संख्या ४०५ वर आली आहे. सध्या ३५० गावे, दोन हजार ९५ वाड्या-वस्त्या, सात लाख ४९ हजार ७२२ नागरिकांना ४०५ टॅंकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

नगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ८७३ वर गेलेली टॅंकरची संख्या ४०५ वर आली आहे. सध्या ३५० गावे, दोन हजार ९५ वाड्या-वस्त्या, सात लाख ४९ हजार ७२२ नागरिकांना ४०५ टॅंकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.

गतवर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे सावट होते. खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगामही वाया गेला. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा, यासाठी प्रशासनाकडे टॅंकरची मागणी करणाऱ्या प्रस्तावांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जूनअखेर ६०३ गावे, तीन हजार ४०० वाड्या-वस्त्यांवरील साडेचौदा लाख नागरिकांना विक्रमी ८७३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. 

सध्या राहाता, नेवासे, संगमनेर, राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या अकरा तालुक्‍यांतील गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वांत जास्त ९५ टॅंकर जामखेड तालुक्‍यात सुरू आहेत, तर सर्वांत कमी एक टॅंकर राहुरी तालुक्‍यात सुरू आहे. पावसाच्या सुरवातीला रोहिणी नक्षत्र कोरडेच गेले. त्यानंतर मात्र सर्व नक्षत्रांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ज्या ठिकाणी पावसामुळे पाणी उपलब्ध होत आहे, त्या ठिकाणचे टॅंकर बंद होत  आहेत. 

टॅंकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर होते; परंतु निर्माण झालेली टंचाई स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारकडून टॅंकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
तालुकानिहाय टॅंकर : संगमनेर-२०, राहुरी- १, नेवासे- ६, राहाता- ५, नगर-३४, पारनेर-५९, पाथर्डी-७५, शेवगाव-३६, कर्जत- ४७, जामखेड-९५, श्रीगोंदे-२७.

इतर बातम्या
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः...आटपाडी ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेला या पुढच्या...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...