agriculture news in marathi, water circulation through tankers status, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नगर  ः पावसाळ्याचे आता अडीच महिने संपले आहेत, पण जोराचा पाऊस नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी होताना दिसत नाही. सध्या जिल्ह्यातील ३५१ गावांत तब्बल ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू केलेले टॅंकर सप्टेंबर महिन्यातही कायम ठेवण्याची आत्तापर्यंतची ही पहिलीच वेळ आहे.

नगर  ः पावसाळ्याचे आता अडीच महिने संपले आहेत, पण जोराचा पाऊस नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता कमी होताना दिसत नाही. सध्या जिल्ह्यातील ३५१ गावांत तब्बल ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू केलेले टॅंकर सप्टेंबर महिन्यातही कायम ठेवण्याची आत्तापर्यंतची ही पहिलीच वेळ आहे.

नगर जिल्ह्यामधील एखादा अपवाद वगळला तर जवळपास सर्वच गावांनी यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र दुष्काळ सोसला आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात पाऊस झाला नाही. परतीचा पाऊस देखील आला नाही. त्यामुळे पाणी साठवण झाले नाही. त्यामुळे पाणीटंचाई कायम आहे. ग्रामीण भागातील लोकांची तहान भागवण्यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा उन्हाळ्यात टॅंकरचा आकडा साडेआठशेंवर गेला होता. 

अल्प पावसावर पिके चांगली दिसत असली तरी, अनेक तालुक्यांत चांगला पाऊस नाही. त्यामुळे पाणीटंचाई कायम आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी सुरू केलेल्या टॅंकरची संख्या कमी झालेली असली तरी तब्बल ३५१ गावांत आणि दोन हजारांपेक्षा अधिक वाडी वस्त्यांवरील लोकांची तहान भागवण्यासाठी पावसाळ्यातही पाण्याचे टॅंकर सुरू ठेवावे लागले आहेत. आत्तापर्यंतची अशी पहिलीच वेळ आहे. मध्यंतरी पंधरा दिवसांपूर्वी टॅंकरची संख्या कमी झाली होती. मात्र आता पुन्हा संख्या वाढली आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न अधिक गंभीर असल्याने पशुपालक त्रस्त आहेत. टंचाई असलेल्या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. 

तालुकानिहाय टॅंकरची संख्या  : संगमनेर ः १८, नेवासा ः ८, राहाता ः ५, नगर ः २९, पारनेर ः ५९, पाथर्डी ः ६०, शेवगाव ः ५७, कर्जत ः ३९, श्रीगोंदा ः २४. कर्जत ः ६०, राहुरी ः १ पारनेर नगर पंचायत ः ५, जामखेड नगर पंचायत ः ३१.

इतर ताज्या घडामोडी
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...